Smart City Nashik: नाशिकच्या पहिल्या स्मार्ट रस्त्याचे फूटपाथ तुटणार; 21 कोटींचा खर्च वाया

Smart City Nashik
Smart City NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): स्मार्टसिटी योजनेतून नाशिक शहरात एक रोल मॉडेल म्हणून उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यानच्या स्मार्टरस्त्याचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या महासभेत या रस्त्याबाबत नगरसेवकांकडून झालेल्या तक्रारीनंतर आयुक्तांनी या रस्त्यावरील पादचारी मार्ग (फूटपाथ) हटवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापौरांनी या रस्त्यावरील सायकल ट्रॅकसाठी बसवण्यात आलेले बॅरिकेडस् हटवण्याचे आदेश देत फूटपाथही काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत उभारलेल्या स्मार्टरस्त्याचे सारे वैभव गळून पडणार आहे. तसेच या रस्त्यासाठी केलेला २१ कोटींची खर्च वाया गेल्यात जमा आहे.

Smart City Nashik
Sinnar Road Project: सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी फुटणार! 'या' 2 प्रमुख रस्त्यांचा होणार कायापालट

स्मार्टसिटीअंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. अशोक स्तंभ ते त्रिंबक रोड असा चांगला रस्ता असताना व शहरात स्मार्ट पायलट रस्त्यासाठी अनेक महत्त्वाचे रस्ते असताना नेमका हाच रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून हाती घेण्यात आला. यामुळे या रस्त्याला सुरवातीपासून विरोध झाला. सुरुवातीला १७ कोटींचा आराखडा असताना प्रत्यक्षात २१ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्याने दंडात्मक कारवाई झाली, पण यथावकाश दंड माफ करण्यात आला. हा रस्ता स्मार्ट होणार म्हणजे काही तरी आगळे वेगळे असेल, अशी समजूत निर्माण केली गेली. प्रत्यक्षात आधीच्या रस्त्यापेक्षा सुमार रस्ता बनवला गेला.

Smart City Nashik
Nashik NMC: नाशिकमधील रस्त्यांच्या कामांची रोज होणार गुणवत्ता तपासणी; पालिकेची 28 रस्त्यांवर करडी नजर

रस्त्याच्या दर्जापेक्षा सुशोभीकरण सारख्या इतर बाबीना महत्त्व दिले गेले. सिग्नलवर फ्री वे बंद करून किंवा अरुंद करून वाहनचालकांची गैरसोय निर्माण केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक उभारले, पण त्याचा वापर चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ म्हणून होत आहे. यामुळे एवढा निधी खर्च करूनही त्यातून कोणालाही समाधान जाणवत नाही. तसेच या रस्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण अधिक असून तुलनेने रुंदी कमी आहे. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी फूटपाथ मोठमोठे आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास दुचाकीस्वार या फुटपाथवरून वाहने चालवतात. यामुळे ठिकठिकाणी फूटपाथ उखडले गेले आहेत.

Smart City Nashik
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी फूटपाथ खोदण्याचे काम सुरूच असते. सुरुवातीला सिग्नलवर फ्री वेसाठी फूटपाथ तोडण्यात आले होते. त्यानंतर गावठाणात २४ तास पाणी पुरवण्याच्या जलवाहिनीसाठी रस्ता खोदण्यात आला. हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करताना त्या भागातील गरजांचा विचार केला गेला नाही. भलामोठा फूटपाथ उभारून ठेवला, पण त्याचा वापर न्यायालयासमोर वाहने उभी करण्यासाठी गेला जात आहे. तसेच या रस्त्याच्या सुशोभिकरणाचीही रया गेली आहे. यामुळे मागील महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेची चिरफाड केली.

Smart City Nashik
Nashik: सिंहस्थातील व्हाईट टॉपिंग रस्ते संशयाच्या भोवऱ्यात! काय आहे कारण?

या चर्चेदरम्यान महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी वाहतूक ठप्प होत असल्याने फूटपाथ हटवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी तातडीने सायकल ट्रॅकसाठी लावण्यात आलेले पिवळे बॅरिगेड्स हटवून फूटपाथ तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नाशिकमधल्या पहिल्यावहिल्या स्मार्ट रस्त्यावरील खर्च केवळ चुकीच्या नियोजनामुळे वाया गेल्यात जमा आहे.

Tendernama
www.tendernama.com