Sinnar Road Project: सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी फुटणार! 'या' 2 प्रमुख रस्त्यांचा होणार कायापालट

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला १३.८० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव; संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी आणि माळेगाव ते गुरेवाडी बाह्यवळण मार्गाचा समावेश
Road
RoadTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक-पुणे महामार्गावर माळेगाव फाटा ते गुरेवाडी फाटा या दरम्यान बाह्यवळण रस्ता करण्यात आल्याने पूर्वीचा सिन्नर शहरातील मार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे. तसेच या मार्गावरील संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी हा जुना शिर्डी मार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने त्याचेही चौपदीरकरण करण्यात यावे, अशा सूचना आमदार माणिकराव कोकोटे यांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही रस्त्यांचे १३ किलोमीटरचे चौपदरीकरण व इतर अनुषंगिक कामे यांच्यासाठी ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणकडे सादर केला असून त्यांनी मान्यता दिल्यास हा रस्ता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
 

Road
Nashik Kumbh Mela: 1,200 कोटींच्या घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गाचा विरोध मावळला; 132 हेक्टर भूसंपादनाचा मार्ग मोकळा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वरसह शिर्डी परिसरातही अनेक विकासकामे सुरू आहेत. यामुळे या सिंहस्थाच्या कामांच्या निमित्ताने आपल्या परिसरातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी कुंभमेळा प्राधिकरणला प्रस्ताव पाठवत असतात. मात्र, सिंहस्थाच्या निमित्ताने कोणत्या परिसरात व कोणती कामे करावीत, याची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. यामुळे सिंहस्थाच्या काळात आमच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने रस्त्याची कामे व्हावीत, असे प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून दिले जातात.

सिंहस्थाच्या निमित्ताने आधीच मंजूर केलेली कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्राधिकरणसमोर आहे. त्यानंतरही कुंभमेळा प्राधिकरणाकडे नवनवीन रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव येत असतात.

Road
Pune Infra News: दक्षिण पुण्याचे टेन्शन मिटणार! पीएमसीने दूर केला भूसंपादनाचा सर्वात मोठा अडथळा

काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील भोसला मिलिटरी स्कूल ते बारदाण फाटा या दरम्यान नवीन ६६ कोटींच्या रस्त्याला कुंभमेळा प्राधिकरणने मान्यता द्यावी, याचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने पाठवला असताना आता आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सिन्नर शहरात जाणारे १३ किलोमीटरच्या दोन रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणकडे पाठवले आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी साधारण ३०० कोटी रुपये निधीची गरज आहे.

नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाटा ते गुरेवाडी बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील माळेगाव एमआयडीसी ते गुरेवाडी दरम्यान ८.५ किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षित झाला आहे. तसेच सिन्नर शिर्डी मार्ग हा नाशिक पुणे महामार्गावरून गुरेवाडी फाटा येथून करण्यात आल्याने सिन्नर शिर्डी या राज्यमार्ग १६० मधील २७ (अ) आणि २७ (ब) म्हणून घोषित करण्यात आला आहे.  

Road
Nashik Infra News: नाशिकमधील कॉलनी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी लागणार 1500 कोटी

माळेगाव (सिन्नर) आणि मुसळगाव एमआयडीसीच्या विस्तारामुळे या मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. पुणे, नाशिक आणि शिर्डीकडून होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक, वाढती वाहनसंख्या आणि अपुरे रस्ते यामुळे या दोन्ही जुन्या मार्गांवर वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या मार्गांच्या चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या या मार्गांपैकी सुमारे ५.१० किलोमीटर भागाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी उर्वरित ८.७० किलोमीटर रस्ता दोन पदरी असल्याने वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे.

प्रस्तावानुसार सिन्नर बाह्यवळण ते गुरेवाडी फाटा या ८.५ किलोमीटर आणि संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी या ५.३ किलोमीटर मार्गांचे काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रस्त्यांच्या कामांवर २४० कोटी रुपये, पूल व इतर संरचनांवर २० कोटी रुपये तसेच इतर पूरक कामांसाठी ४० कोटी रुपये असा एकूण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Road
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांनी ते प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर केला आहे.

एकूण प्रकल्प खर्चः ३०० कोटी रुपये
रस्त्याची एकूण लांबीः १३.८० किलोमीटर

Tendernama
www.tendernama.com