Nashik : निओ मेट्रोला चालना; प्रकल्पाचे पीएमओत सादरीकरण

दोन वर्षांपासून पीएमओकडून (पंतप्रधान कार्यालय) अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
Metro Neo
Metro NeoTendernama

नाशिक (Nashik) : गेल्या दोन वर्षांपासून पीएमओकडून (पंतप्रधान कार्यालय) अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असलेल्या नाशिक मेट्रो निओ प्रकल्पाचे महापालिका अधिकाऱ्यांनी पीएमओ सचिवांसमोर सादरीकरण करणे केले आहे. तसेच निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवालही महामेट्रोचे एमडी डॉ. ब्रिजेश मिश्रा यांनी बुधवारी (दि. १५) 'पीएमओ' कार्यालयाच्या सचिवांकडे सुपूर्द केला आहे.

Metro Neo
Eknath Shinde: कल्याणसाठी मेट्रो 12 आणि 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

यामुळे अनेक वर्षांपासून केवळ चर्चेच्या पातळीवर असलेला निओ प्रकल्प प्रत्यक्षात येण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. या सविस्तर प्रकल्प अहवााचा अभ्यास करून त्याबाबतच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर हा प्रकल्प मंत्रीमंडळ बैठकीत सादर केला जाणार असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Metro Neo
Nashik ZP : जलजीवनच्या 185 कामांना सुरू होण्याची प्रतीक्षा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिल्या टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून या प्रकल्पास तत्वता मंजुरी मिळाली. त्यानुसार महापालिकेने निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला व पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र,  तब्बल दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पडून आहे. यामुळे या प्रकल्पबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Metro Neo
Nashik DPC : तब्बल 328 कोटी रुपये दीड महिन्यात खर्चाचे आव्हान

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील आठवड्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने नाशिक येथे आले असता त्यांनी मेट्रो निओबाबत लवकरच घोषणा होणार असल्याचे जाहीर केले होते. मेट्रो निओ प्रकल्पाला उशिरा का होईना चाल मिळाली आहे. 'पीएमओ' कार्यालयात बुधवारी (दि. १५) महामेट्रोचे एमडी मिश्रा, संचालक सुनील माथूर आणि आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मेट्रो निओच्या सचिवांसह अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. यावेळी मेट्रो निओचा 'डीपीआर' देखील महामेट्रोने सादर केला. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्येही या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

Metro Neo
Mumbai : 'बेस्ट' 10 लाख स्मार्ट वीज मीटर बसवणार; 1300 कोटींचे बजेट

मेट्रो निओ एक दृष्टीक्षेप
टायरबेस्ड मेट्रो
प्रकल्पासाठीचा खर्च २१००.६ कोटी रुपये
केंद्र सरकारचा वाटा ७०७ कोटी रुपये
राज्य सरकार, सिडको, मनपाचा वाटा २५५ कोटी रुपये
कर्ज उभारणार ११६१ रुपये
एका बसची लांबी २५ मीटर
प्रवासी क्षमता २५० असणार
प्रत्येकी ३१ किमी लांबीचे दोन एलिव्हेटेड मार्ग
मार्गावर एकूण २९ स्थानके 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com