Eknath Shinde: कल्याणसाठी मेट्रो 12 आणि 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन मेट्रो-१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde
Exclusive: प्रतिक्षा संपली; 'हा' प्रकल्प 28 वर्षांनी पूर्णत्वाकडे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) सुशोभीकरण, मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर (कल्याण प.) व बी. एस. यु. पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्प बाधितांना वाटप आदी विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदानात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
Tender : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी गुड न्यूज; 75 लाखांची..

यावेळी प्रबोधनकार ठाकरे तलाव उर्फ भगवा तलाव (काळा तलाव) याचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. शिंदे म्हणाले की, कल्याणमधील भगवा तलाव हा ऐतिहासिक आहे. या ठिकाणी ज्या सुविधा करता येतील त्या कराव्यात. कल्याण एक ऐतिहासिक शहर आहे. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरचा कल्याण डोंबिवली हा सगळा परिसर आता वाढत आहे. मुंबईतले लोक ठाण्याकडे आणि ठाण्यातले लोक कल्याण डोंबिवलीमध्ये येत आहेत. येथील लोकांसाठी परवडणारी घर मिळाली पाहिजे. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि म्हणून ते देण्याचे काम आज कल्याण डोंबिवलीमध्ये झाले आहे. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआरला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबईत येणार, कारण...

खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते देखील खड्डे मुक्त करू. चांगले रस्ते, दिवाबत्ती, पाणी, उद्यान हा लोकांचा अधिकार आहे. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी चांगल्या मूलभूत सोयी सुविधा देण्याचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देखील जे जे आपल्याला देता येईल ते नक्की दिले जाईल. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे, बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालोय त्यामुळे हक्काचा मुख्यमंत्री तुम्हाला निधी देईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
Mumbai : हायटेक नालेसफाई; रोबोटिक बहुउद्देशीय उत्खनन यंत्राचा वापर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत बीएसयूपीच्या घरे वाटप होत आहे हा आनंदाचा क्षण आहे. ही घरे चांगली असून येथे सर्व सुविधा आहेत. कल्याणमध्ये मोठमोठी कामे सुरू आहेत. दुर्गाडी पूल, पत्री पूल, ऐरोली काटाई रस्ता अशी मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत, या कामांमुळे प्रवास सुखकर होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारे मोठे प्रकल्प येतील. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.

Eknath Shinde
Mumbai : पूर्व, पश्चिम मार्गांच्या दुरुस्तीसाठी 250 कोटींचे टेंडर

केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, राज्य सरकार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. भगवा तलावाच्या सुशोभीकरणमुळे कल्याणच्या वैभवमध्ये भर घालण्याचे काम केलेले आहे. अथक प्रयत्नांनंतर बीएसयुपीची घरे आज कल्याणकरांच्या सेवेत आली आहेत. यापुढील काळात कल्याणमधील कुठलाही रस्ता हा डांबरी राहणार नाही सर्व रस्ते हे काँक्रीटचे होतील. कार्यक्रमास ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com