NHAI चा मोठा निर्णय; रस्ते बांधकामातील विलंब टाळण्यासाठी आता...

Road
RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामात होणारा विलंब लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्वयंचलित आणि इंटेलिजेंट मशीन-असिस्टेड कन्स्ट्रक्शन (AIMC) प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Road
Pune : पुणे रेल्वे स्थानकाला वगळून 'असा' होणार नवा रेल्वे मार्ग

ही प्रणाली प्रत्येक निर्माणाधीन बांधकाम कोणत्या टप्प्यावर आहे त्याच्या सर्वेक्षणासह सर्व प्रकल्पाच्या स्थितीचा वेळ आणि डेटा देईल. हा डेटा तत्काळ मंत्रालयासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि विभागांना पाठवण्यात येईल. अमेरिका, नॉर्वे आणि युरोपियन युनियन देशांच्या व्यवस्थेचा अभ्यास करून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) यासारख्या सर्व विभागांना ते पाठवले आहे. याद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये एआयएमसी राबवण्यासाठी सूचना आणि माहिती मागवण्यात आली आहे.

Road
Pune : शिवाजीनगर एसटी स्थानक होणार पूर्वीच्याच ठिकाणी; महामंडळ आणि महामेट्रोत करार

महामार्गाचे बांधकाम करत असताना विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर केल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यानंतर हे काम अधिक सोप्पे झाले आहे. इंटेलिजन्स रोड कन्स्ट्रक्शन यंत्रामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारते आणि ते अधिक काळ टिकतात. ही यंत्रे विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतील.

अलीकडेच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, मार्च 2024 मध्ये निर्माणाधीन 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 952 प्रकल्पांपैकी (राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसह) एकूण 419 प्रकल्पांना विलंब झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या विविध टप्प्यांपैकी एक टप्पा पूर्ण झाला नाही.

Road
Ajit Pawar : रस्ते आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अजित पवारांकडून महापालिकेला...

राजमार्ग प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची अनेक कारणे आहेत. जुने तंत्रज्ञान, अद्ययावत माहितीचा अभाव आणि कंत्राटदारांची खराब कामगिरी यामुळे या समस्या वाढतात.

एआयएमसी हे एक प्रकारचे नवीन तंत्रज्ञान आहे, ज्यात ऑटोमेशन, इंटेलिजन्स, मेकॅनिक्स आणि कंट्रोल यांचा समावेश आहे. मानवी श्रम कमी करून उत्पादन कार्यक्षमता आणि अचूकता वाढवण्यासाठी उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा आणि वाहतूक यासारख्या विविध उद्योगांमध्ये एआयएमसीचा वापर केला जातो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com