अबब; मुंबई महापालिकेचे चारशे कोटी खड्ड्यात!

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चर बुजवण्याच्या कामांमधील घोटाळ्याचे आजवर आरोप होत असतानाच यासाठी नव्याने टेंडर (Tender) न काढता तीन महिन्यांसाठी पुन्हा विद्यमान कंत्राटदारांवरच जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला संपूर्ण मुंबईतील खोदलेले चर बुजवण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील सव्वातीन वर्षात यावर ४१७ कोटी ५६ लाख रुपये इतका खर्च झाला आहे.

BMC
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाने गाठला आणखी एक मैलाचा दगड

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह इतर खासगी संस्थांच्या माध्यमातून सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी खोदण्यात येणारे चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी सात याप्रमाणे स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक २०१९ मध्ये दोन ऐवजी स्थायी समितीच्या मंजुरीने तीन वर्षांकरता करण्यात आली आहे. हा कालावधी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेने ऑक्टोबर २०२१ मध्ये टेंडर मागवले होते. परंतु उणे ३० ते ४० टक्के कमी दरातील टेंडर रद्द करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या चर बुजवण्याच्या कामांचे टेंडर अधिक ६ टक्के ते उणे चार टक्के दराने आल्यानंतरही तांत्रिक कारण देत रद्द केल्या.

BMC
मोक्‍याच्या ठिकाणच्या 13 शाळा विक्रीसाठी महापालिकेनी काढले टेंडर

तसेच महापालिकेतर्फे नव्या कंत्राटदारांची निवड करण्यासाठी जे टेंडर मागविण्यात आले होते. यामध्ये कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा कमी दरात बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या कामाचे रिटेंडर मागवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र मागविण्यात आलेल्या रिटेंडरमध्ये काही नेमक्याच कंत्राटदारांनी भाग घेतला होता. जिथे याआधी ५३ कंत्राटदारांनी सहभाग नोंदवला होता, तिथे टेंडरमध्ये 'स्पेशिफिक' अट घालण्यात आल्यामुळे केवळ २२ कंपन्यांनाच सहभाग घेता आला. त्यामुळे 'ती' अट उर्वरित ३१ कंपन्यांना टेंडर मधून बाद करण्यासाठी आणि काही विशिष्ट कंपन्यांना लाभ पोहोचवण्यासाठी घालण्यात आली होती अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरु होती.

BMC
बीएमसी भ्रष्टाचाराचे 'कुरण'; पार्किंग टेंडरमध्ये शंभर कोटींचा घोळ!

आता मूळ कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपल्याने आणि अजून कंत्राटदार निश्चित न झाल्याने फेब्रुवारी २०२२पर्यंत तीन महिन्यांकरता कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला. या तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये प्रत्येक परिमंडळांना वाढवून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राट कामांवर आतापर्यंत ३९६ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात आता २१ कोटी रुपयांची भर पडल्याने चर बुजवण्याचा मागील सव्वा तीन वर्षांतील कालावधीत ४१७ कोटी ५६ लाख रुपये एवढी एकूण रक्कम खर्च झाली आहे.

BMC
मुंबई महापालिकेची पत ढासळली; कंत्राटदाराची देणी थकली
  • परिमंडळ १: हिरानी एंटरप्रायझेस (मूळ कंत्राट – ६७ कोटी ४५ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ २: आर्मस्ट्राँग कन्स्ट्रक्शन (मूळ कंत्राट – ४५ कोटी ४६ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ ३: प्रगती एंटरप्रायझेस (मूळ कंत्राट – ६० कोटी ३७ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ ४: कोणार्क स्ट्रक्चरल (मूळ कंत्राट – ७० कोटी ९० लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ ५: लँडमार्क कार्पोरेशन (मूळ कंत्राट – ५९ कोटी ३५ लाख, वाढीव कंत्राट – ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ ६: वैभव एंटरप्रायझेस (मूळ कंत्राट – ३७ कोटी ५८ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)

  • परिमंडळ ७: बिटकॉन इं इन्फस्ट्रक्चर(मूळ कंत्राट – ४५ कोटी ४६ लाख, वाढीव कंत्राट – ३ कोटी रुपये)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com