मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाने गाठला आणखी एक मैलाचा दगड

Trans Harbour Link

Trans Harbour Link

Tendernama

मुंबई (Mumbai) : भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाने शुक्रवारी आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. प्रकल्पाच्या पॅकेज 1 मधील पहिला आर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) उभारण्यात आला. या ओएसडीची लांबी 119 मीटर आणि वजन 1331 मेट्रिक टन इतके आहे.

Trans Harbour Link

वाहने आणि जाहिरात फलकांच्या कोंडीत अडकले कोट्यवधीचे सायकल ‘ट्रॅक’

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तर्फे एकूण 21.8 किमी लांबीच्या, सहा लेनच्या या समुद्री मार्गाचे बांधकाम सुरु आहे. यात 16.5 किमीचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित 5.3 किमीचा रस्ता यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन नवी मुंबईचा आर्थिक विकास होईल, असे अपेक्षित आहे. हा रस्ता मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 4 बी वरील चिरले येथे जोडला जाईल. हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल असेल आणि यावर दररोज सुमारे 70 हजार वाहनांचे ये-जा होईल.

Trans Harbour Link

पुणे महापालिकेने रद्द केले ८० कोटींचे टेंडर, कारण...

या प्रकल्पातील पॅकेज 1 चे बांधकाम लार्सन ऍण्ड टुर्बो (एल ऍण्ड टी) लिमिटेड (इंडिया) आणि मे. आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम कं. लि. (जपान) यांच्यातील संयुक्त उपक्रमाला देण्यात आले आहे. ओएसडी ब्रीजचे स्वत:चे वजन कमी असले तरी यात कमी आणि छोटे पिलर्स लागत असल्याने काँक्रिट किंवा कम्पोसाइट ग्रीडर ब्रीजच्या तुलनेत हे बांधकाम अधिक मजबूत आहे. एमटीएचएल ब्रीजवरील हा ओएसडी म्हणजे अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि विविध दर्जा नियंत्रणासह उभारण्यात आलेला जगातील सर्वाधिक लांबीचा ओएसडी आहे.

Trans Harbour Link

'या'मुळे मंदावली शिवडी-नाव्हा शेवा ट्रान्सहार्बर लिंकची गती

ओएसडीची निर्मिती कारखान्यांमध्ये केली जाते त्यामुळे प्रत्यक्ष साइटवर फारसे काम करावे लागत नसल्याने ओएसडीच्या उभारणीला कमी काळ लागतो आणि प्रकल्पातील सुरक्षेचे प्रश्नही कमी होतात. इतकेच नाही, कमी आणि छोटे पिलर्स तसेच बांधकामाला लागणारा कमी वेळ यामुळे अर्थातच पर्यावरण आणि परिसंस्थेवर परिणामही कमी होतो. डेकच्या भागाला कमाल 30 मीटर असे सहा ते आठ ब्लॉक्समध्ये विभागण्यात आले. समुद्री मार्गाने एकूण 33 शिपमेंटमध्ये ते साइटवर आणण्यात आले. हे ब्लॉक्स प्रकल्पाच्या ठिकाणी एकावर एक असे कमाल 180 मीटर उंची आणि कमाल वजन 2600 मेट्रिक टन रचले गेले आणि त्यानंतर ते एसपीएमटी (सेल्फ-प्रॉपेल्ड मॉड्युलर ट्रान्सपोर्टवर)वरून तात्पुरत्या जेट्टीवर नेले गेले. 300 मेट्रिक टनाच्या 16 लिफ्टिंग टॉवर्ससह हे ओएसडी खास बार्ज इक्विपमेंटवर लोड करण्यात आले आणि स्ट्रँड जॅक्सच्या साह्याने ती पिलर्सच्यावर ठेवण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com