मोक्‍याच्या ठिकाणच्या 13 शाळा विक्रीसाठी महापालिकेनी काढले टेंडर

Solapur Municipal Corporation

Solapur Municipal Corporation

Tendernama

सोलापूर (Solapur) : शहरात पुढाऱ्यांच्या वाढत्या खासगी शाळा आणि महापालिकेने शिक्षणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या 13 शाळा बंद पडल्या. तळीरामांचा अड्डा आणि अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या शाळा 29 वर्षाच्या करारावर भाडेतत्वावर देण्याचे टेंडर महापालिकेनी काढले.

Solapur Municipal Corporation

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाने गाठला आणखी एक मैलाचा दगड

सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या सोलापूर महापालिका शिक्षण सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. मुलभूत सुविधा देण्याबरोबर शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. महापालिकेच्या शाळांना पावणे दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे. महापालिकेच्या मालकीचे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकूण 71 शाळा आहेत. त्यातील 13 शाळा या विद्यार्थ्याविना गेल्या 25 वर्षांपासून धूळखात पडून आहेत. एकीकडे पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने महापालिका शाळा आवारातच नियमांचे उल्लंघन करून ढिगभर खासगी शाळांची उभारणी झाली.

Solapur Municipal Corporation

ई-टेंडर सर्वात कमी, तडजोडीत सर्वाधिक!; प्रशासनावर सदस्यांचा आक्षेप

दुसरीकडे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक मुलभूत शिक्षण सुविधा देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. या दोन्हीचा फटका शहरवासियांना बसला. महापालिकेच्या शाळेतील सुविधांच्या अभावामुळे नाइलाजस्तव खासगी शाळेत फी भरून मुलांना शिक्षण देण्याची वेळ पालकांवर आली. पाणी, रस्ते, ड्रेनेज, गटारी वगळता महापालिकेत आरोग्य व शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी आजपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले नाही. त्यातच शिक्षण समिती बरखास्त होऊन आठ वर्षे झाली. या विभागाला कोणी वालीच राहिला नाही. महापालिका शाळेतील विद्यार्थी संख्या घटली. शाळा परिसर तळीरामांचे अड्डे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. शहरात नव्याने 350 खासगी शाळा अस्तित्वात आल्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाला शहरातील बंद पडलेल्या 13 शाळांची टेंडर काढण्याची नामुष्की ओढवली. याला प्रशासनासह पदाधिकारीही तितकेच जबाबदार आहेत.

Solapur Municipal Corporation

पुणे महापालिकेची उधळपट्टी;टेंडर नाही अन् सल्लागारावर कोट्यवधी खर्च

29 वर्षे 11 महिन्याचा करारावर या 13 शाळा काढल्या विक्रीला

- शुक्रवार पेठ ढोर गल्ली, किडवाई चौक, मंगळवार बाजार, सरस्वती चौक, रामलाल चौक रेल्वे लाईन, तुळजापूरवेस, चौपाड दक्षिण कसबा, लोधी गल्ली उत्तर सदर बझार, विडी घरकूल.

आजची स्थिती

- आजमितीलाही महापालिका शाळांची स्थिती बिकट असून मराठी, उर्दू, कन्नड आणि इंग्लिश माध्यमचे एकूण शाळा संख्या 58

- या सर्व शाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या 5 हजार 300 इतकी

- शिक्षक 212 आहेत.

- या शाळांना सुरक्षारक्षक नसल्याने शाळा सुटल्यानंतर तळीरामांसाठी हा परिसर मोकळाच असतो.

- विद्यार्थ्यांना शिकविण्यापूर्वी शिक्षकांना शाळेतील दारु बॉटल गोळा करण्याचे पहिले काम असते.

Solapur Municipal Corporation

पुणे महापालिकेने रद्द केले ८० कोटींचे टेंडर, कारण...

महापालिका सभेत शाळांचा ठराव करण्यात आला आहे. त्या ठरावानुसार पहिल्या टप्प्यातील 9 शाळा 29 वर्षे 11 महिन्याच्या भाडेतत्वावर देण्याकरिता इ निविदा काढण्यात आली आहे. येत्या मंगळवारी ही निविदा ओपन करण्यात येणार आहे.

- विक्रम पाटील, सहा. आयुक्‍त.

शहरातील चालू व बंद असलेल्या शाळांची सुरक्षा ही मोठी समस्या बनली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या शाळा परिसरात अतिक्रमण, अवैध व्यवसाय चालत होते. त्याऐवजी या शाळांचा जागेचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा. महापालिकेचे उत्पन्नही वाढले पाहिजे यादृष्टीने 13 शाळा भूमी व मालमत्ता विभागकडे हस्तांतर करून घेण्यासाठी सन 2015 मध्येच कळविले होते. मात्र सन 2020 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या बंद असलेल्या शाळांची टेंडर निघाले आहे.

- कादर शेख, प्रशासन अधिकारी महापालिका शिक्षणविभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com