टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकल्पात १७६ कोटींची फसवणूक; बिल्डर्सविरोधात गुन्हा

२०२२पासून बांधकाम बंद असल्याचा तक्रारीत दावा; १८४ सदस्यांसह शेकडो फ्लॅटधारकांकडून रक्कम घेतल्याचा आरोप
redevelopment
redevelopmentTendernama
Published on: 

कल्याण (Kalyan): कल्याण पश्चिमेतील ‘टायकुन गोल्ड एव्हेन्यू’ पुनर्विकास प्रकल्पात १७६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून विकासकांसह संबंधित व्यक्तींविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत दिगंबर शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी यांच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

redevelopment
मुंबई 3.0ला सिंगापूरची साथ; रायगड-पेणमध्ये मोठ्या गुंतवणुकीची तयारी

कल्याण पश्चिमेतील ‘टायकुन गोल्ड एव्हेन्यू’ पुनर्विकास प्रकल्पात १७६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून विकासकांसह संबंधित व्यक्तींविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत दिगंबर शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी यांच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम २०२२पासून बंद असून, सोसायटीची जमीन गहाण ठेवून रहिवासी आणि फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पुनर्विकासाचे आश्वासन; घराचा ताबा नाही

कल्याणमधील चिकनघर येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील म्हाडाच्या एमआयजी योजनेतील शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासाचे काम टायकुन अवंती प्रोजेक्ट्स एलएलपीकडे देण्यात आले होते. टायकुन रियल्टीज एलएलपी आणि सिकॉम रियल्टी लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम असल्याचे तक्रारीतमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नंदा प्रभाकर म्हात्रे यांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील ११व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१साठी ३९ लाख ३६ हजार ६९ रूपये भरल्याचे नमूद करण्यात आले आहे. जुलै २०२५पर्यंत सदनिकेचा ताबा देणे अपेक्षित असतानाही तो देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

redevelopment
Mission Mumbai 2047: AI रोखणार नालेसफाईतील गैरव्यवहार रोखणार; दोषी कंत्राटदारांना कोट्यवधींचा दंड

दहाव्या मजल्यावर काम थांबले

विकासकांनी प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत केले असून, त्यानंतर काम अर्धवट राहिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. २०२२पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे मूळ रहिवाशांसह नव्या सदनिका खरेदीदारांपुढे घराचा ताबा मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोसायटीची जमीन गहाण ठेवल्याचा आरोप

विकासकांना देण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारामुळे सोसायटीचे रहिवासी आणि सदनिका खरेदीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे तक्रारीत नमूद आहे. शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १८४ सदस्य आणि इतर शेकडो फ्लॅट खरेदीदारांकडून मिळून १७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घराचा ताबा, पुनर्विकास आणि आर्थिक व्यवहार याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

redevelopment
Thane Cluster Scheme: ठाणे क्लस्टर प्रकल्पांना 'व्हायटल PUBLIC HOUSING'चा दर्जा; महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे हस्तांतरण

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रेमनाथ शेटे ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. प्रकल्पातील आर्थिक व्यवहार, सोसायटीच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार तसेच सदनिका खरेदीदारांकडून घेतलेल्या रकमेची चौकशी करण्यात येणार असली तरी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

redevelopment
Nashik: 'बंपर कुंभमेळा भरती'ची बनावट जाहिरात व्हायरल; पंचवटीत गुन्हा दाखल

Key Points

  • टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकल्पात १७६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचा आरोप

  • विकासकांसह संबंधित व्यक्तींविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

  • २०२२पासून प्रकल्पाचे काम बंद असल्याचा तक्रारीत दावा

  • बांधकाम दहाव्या मजल्यापर्यंतच झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे

  • शांतीदूत सोसायटीतील १८४ सदस्यांसह शेकडो फ्लॅटधारकांकडून रक्कम घेतल्याचा आरोप

  • सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप

  • जुलै २०२५पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याचा दावा

  • आर्थिक व्यवहार आणि जमीन गहाण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू

Tendernama
www.tendernama.com