Nashik: 'बंपर कुंभमेळा भरती'ची बनावट जाहिरात व्हायरल; पंचवटीत गुन्हा दाखल

सरकारी आरोग्य विभागाची भरती असल्याचा सोशल मीडियावर आभास; कोणत्याही उमेदवाराची प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झाली नसल्याची माहिती
Nashik City, nmc, Kumbh
Nashik City, nmc, KumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट प्रशासकीय मंजुरी आणि कार्यारंभ आदेश वापरून ठेकेदारांची फसवणूक केल्याची पाचपेक्षा अधिक प्रकरणे उघड झाल्यानंतर आता आरोग्य विभागातील भरतीची बनावट जाहिरात समोर आली आहे. सरकारी भरती असल्याचा आभास निर्माण करून सोशल मीडियाद्वारे बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Nashik Kumbh Mela: कामे हातची जाण्याच्या भीतीने सावळा गोंधळ; तांत्रिक मान्यता आणि अंदाजपत्रकाविनाच कोट्यवधींचे टेंडर प्रसिद्ध

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणच्या नावाने बनावट प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश वापरून ठेकेदारांची फसवणूक केल्याची पाचपेक्षा अधिक प्रकरणे उघड झाल्यानंतर आता सिंहस्थाच्या नावाने आरोग्य विभागातील बनावट भरतीची जाहिरात उघडकीस आली आहे.

सार्वजनिक आरोग्य शासकीय भरती असल्याचे भासवून सोशल मीडियावर जाहिरात करून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Nashik Tender: कुंभमेळ्यात 591 कोटींचे टेंडर मिळवून देण्यासाठी तीन कोटींना गंडा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून त्यात अनेक विभागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाची भरतीही केली जात आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत 'हिलफोर्स फाउंडेशन मल्टिसर्व्हिसेस' या संस्थेच्या नावाने 'बंपर कुंभमेळा भरती २०२६-२०२७' या नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

ही जाहिरात थेट शासकीय किंवा आरोग्य विभागामार्फत काढण्यात आल्याचा आभास निर्माण होईल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली होती. त्यानंतर ती व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामद्वारे मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, या गुन्ह्यातील मुख्य संशयित ॲम्बुलन्सचालक असल्याने त्याला आगामी सिंहस्थ काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी असू शकते, याची कल्पना होती. याचा गैरफायदा घेण्यासाठी त्याने दोन साथीदारांसोबत मिळून 'हिलफोर्स फाउंडेशन मल्टिसर्व्हिसेस' संस्था स्थापन केली. पंचवटीतील आरटीओ कार्यालयासमोरील एका रुग्णालयाजवळील कॉम्प्लेक्समध्ये या संस्थेचे भाड्याने कार्यालय सुरू करण्यात आले होते.

Nashik City, nmc, Kumbh
Nashik Tender News: काम न करताच पुन्हा ₹3.75 कोटींचे बील काढून घेण्याचा डाव कसा उधळला?

ही संस्था खासगी रुग्णालयांना पॅरामेडिकल मनुष्यबळ पुरवण्याचे काम करते. मात्र, कोणतीही शासकीय परवानगी नसताना 'सिंहस्थ कुंभमेळा' या नावाचा वापर करून आर्थिक फायद्यासाठी बनावट भरती जाहिरात प्रसिद्ध केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सचिन रतन शिंदे (वय २९, रा. देवळा, जि. नाशिक), नीलेश बबन घोलप (वय २२, रा. ओतूर, ता. कळवण) आणि विक्रांत विजय सूर्यवंशी (वय ३०, रा. तांबे मळा, पेठ रोड) अशी संशयितांची नावे आहेत.

सचिन शिंदे हा संस्थेचा अध्यक्ष असून, तो ॲम्बुलन्सचालक आहे. नीलेश घोलप हा संस्थेचा सचिव असून, मेडिकल सर्व्हेअर म्हणून काम करतो, तर विक्रांत सूर्यवंशी हा संस्थेचा उपाध्यक्ष आहे. ही बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली.

याप्रकरणी संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. योगेश चित्ते (रा. चेतना नगर) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांच्या जाळ्यात अडकून अद्याप कोणत्याही उमेदवाराची प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झालेली नसल्याचे समोर आले आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Nashik Kumbh Mela Scam: समोर आला सिंहस्थातील कामांसंबंधी तिसरा बनावट आदेश

Key Points

  • सिंहस्थाच्या नावाने आरोग्य विभागातील भरतीची बनावट जाहिरात प्रसारित

  • ‘बंपर कुंभमेळा भरती २०२६-२०२७’ नावाने सोशल मीडियावर प्रचार

  • सरकारी आरोग्य भरती असल्याचा आभास निर्माण केल्याचा आरोप

  • व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जाहिरात प्रसारित

  • पंचवटी पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

  • माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद

  • संस्थेचे कार्यालय पंचवटी परिसरात भाड्याने सुरू करण्यात आले होते

  • संशयितांमध्ये संस्थेचा अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्षाचा समावेश

  • डॉ. योगेश चित्ते यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

  • कोणत्याही उमेदवाराची प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही

Tendernama
www.tendernama.com