Nashik Kumbh Mela Scam: समोर आला सिंहस्थातील कामांसंबंधी तिसरा बनावट आदेश

ठाण्याच्या अभिषेक संजय झरे याच्या विरोधात त्र्यंबकेश्वर येथे गुन्हा दाखल
Nashik, Tender Scam
Nashik, Tender ScamTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे हजारो कोटींची कामे होत असून त्यात आपल्याला एखादे काम मिळावे, अशी प्रत्येक ठेकेदाराची इच्छा आहे. त्याचा गैरफायदा उठवून ठेकेदारांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बनावट प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश तयार करण्याचा तिसरा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik, Tender Scam
Nashik: कुंभमेळा कामाच्या नावाखाली डॉ. गेडाम यांच्या खोट्या स्वाक्षरीने 35 कोटींच्या कार्यारंभ आदेशामुळे खळबळ

यापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या बनावट स्वाक्षरींचे खोटे आदेश उघडकीस आल्यानंतर आता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानेच अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिख यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी बनावट स्वाक्षरींचे आदेश अभिषेक संजय झरे याच्याच नावाने आहेत. यामुळे नाशिकरोड, नाशिकनंतर अभिषेक झरे विरोधात आता त्र्यंबेकश्वर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik, Tender Scam
Nashik Kumbh Mela Scam: विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि 35 कोटींचे खोटे Tender; 'इनोव्हेटीव्ह' एजन्सीचा संचालक अटकेत

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात २७ एप्रिल २०२६ रोजी गजानन पाटील नावाची व्यक्ती  येऊन तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वैद्य यांना भेटला. त्याच्याकडे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने अभिषेक संजय झरे (संचालक व संस्थापक) इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन एजन्सी ठाणे, याचे नावे सीसीटीव्ही सुरक्षा निरीक्षण कामाचे कार्यादेश व परवानगी या विषयाबाबतचे कागदपत्र होते. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही सुरक्षा निरीक्षण प्रणाली उभारणी व संबंधित कामकाज करण्याचा देवस्थान ट्रस्टतर्फे दिलेल्या कार्यादेशाचा समावेश होता.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या लेटर हेडवर कार्यादेश देण्यात आला होता. तसेच त्यावर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नाशिक यांची सही असल्याचे दिसून येत होते. समीर वैद्य यांना त्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाला. यामुळे त्यांनी देवस्थान अभिलेखात या कागदपत्रांची पडताळणी केली.

Nashik, Tender Scam
गोष्ट न बघितलेल्या कायद्याच्या बालेकिल्ल्याची; सिंहस्थाचे काम अडवण्याची आता कोणात हिम्मतच उरली नाही!

त्यांना देवस्थानतर्फे सीसीटीव्ही कामासंदर्भात कोणतीही टेंडरप्रक्रिया राबवल्याचे आढळून आले नाही. तसेच त्या कामाचे कार्यादेश दिल्याचेही आढळून आले नाही. यामुळे सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याचे त्यांना आढळून आले. यामुळे बनावट कार्यादेश ज्यांच्या नावाने बनवण्यात आले आहेत, त्या संजय झरेविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वैद्य यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने नाशिकरोड येथे विभागीय कार्यालयाकडे याबाबत माहिती घेण्यासाठी पत्रव्यवहार केला असता त्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीद्वारे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने दोन बनावट कार्यादेश तयार केल्याचे त्यांना कळवण्यात आले. त्या प्रकरणी केलेल्या तपासात अभिषेक संजय झरेच्या जप्त मोबाइलमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा निरीक्षण कामासाठी कार्यादेश व परवानगी असलेली कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात मिळून आले होते.

Nashik, Tender Scam
Exclusive: बायोमायनिंग की भ्रष्टाचाराचे 'मायनिंग'? कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जातोय जनतेचा पैसा!

यावरून संशयित झरे याने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावाने बनावट व खोटे कार्यादेश तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच संशयिताने देवस्थान ट्रस्टचे लेटरहेड तयार करून त्यावर ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश, नाशिक यांची हुबेहुब स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tendernama
www.tendernama.com