Nashik Tender: कुंभमेळ्यात 591 कोटींचे टेंडर मिळवून देण्यासाठी तीन कोटींना गंडा

बनावट कार्यारंभ आदेश आणि डिजिटल स्वाक्षरीचा वापर; दोघांना जामनेरमधून अटक, एक संशयित फरारी
Nashik City, nmc
Nashik City, nmcTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याची ५९१ कोटी रुपयांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीची तीन कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. जामनेर (जि. जळगाव) येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तनय अनंत महाजन (३२, रा. पाचोरा रोड, जामनेर, जि. जळगाव), नरेंद्र तुकाराम महाजन (५१, रा. नवसखा, देशमुख गल्ली, जामनेर, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, संशयित शकील अहमद सलीम्मुद्दीन शेख हा फरारी आहे.

Nashik City, nmc
Nashik Potholes: आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा; गिरीश महाजनांचा महापालिकेला अल्टिमेटम

संशयितांनी भारत सरकारचे राजमुद्रा असलेले नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचे बनावट पत्र आणि त्यावर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी असलेले ५९१ कोटी रुपयांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार केले. इतकेच नव्हे, तर नाशिक महापालिकेच्या टेंडर नोटीसचा क्रमांक असलेले बनावट आदेश दाखवून तक्रारदारास हाऊस किपिंगचे कार्यारंभ आदेश प्राप्त करून देतो, असे खोटे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून तक्रारदाराकडून संशयिताने तब्बल तीन कोटी पाच लाख रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

Nashik City, nmc
Nashik Potholes: आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा; गिरीश महाजनांचा महापालिकेला अल्टिमेटम

कोट्यवधी रुपयांच्या या गंभीर फसवणुकीची दखल घेत आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुंडा पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे दोघा संशयितांचा माग काढला. संशयित तनय हा छायाचित्रकार असून, नरेंद्र महाजन याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत बनावट टेंडरच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार फसवणूक झालेल्या तक्रारदाराने नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असता, त्याचपूर्वी संशयितांच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा संशयितांना जामनेरमध्येच सापळा रचून बेड्या ठोकल्या.

Nashik City, nmc
Nashik: नाशिकमध्ये 100 EV चार्जिंग स्टेशनची गरज; महापालिकेची प्रत्यक्षात फक्त 13 केंद्रे सुरू

पोलिसांना सुविधां पुरवण्याचे कंत्राट
पहिल्या गुन्ह्यात संशयितांनी कुंभमेळादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचारी, एसआरपीएफ, गृहरक्षक दल यांच्या ७० दिवसांसाठी दोन वेळच्या जेवण व पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठीच्या टेंडरसाठी १.४० कोटी रुपये तक्रारदाराकडून घेतले.
 दुसऱ्या गुन्ह्यात संशयितांनी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची स्वच्छता, त्याठिकाणी बादली, मॅट्रेस, गाद्या पुरविण्याच्या टेंडरसाठी ५० लाख रुपये तक्रारदाराकडून घेतले.

तिसऱ्या गुन्ह्यात संशयितांनी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी सोलर पॉवर प्लांट बसविणे आणि बॅटरी, इर्न्व्हटर बसविण्याच्या टेंडरसाठई १.१५ कोटी रुपये तक्रारदाराकडून घेतले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी त्यांच्या बँक खात्यावर एकूण तीन कोटी पाच लाख रुपये घेतले आहेत.

Nashik City, nmc
Nashik Roads: नाशिक शहरातील रस्ते 'खड्ड्या'त गेले तरी महापालिकेला रम्बलर्स बसविण्याची घाई! 10 कोटींचे कंत्राट

मंत्री महाजन यांचा खुलासा...
नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक प्रकरणी दोघांना जळगावहून अटक करण्यात आली आहे. गोदावरी काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा मंत्री गिरीश महाजन यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. यापूर्वी देखील त्यांनी जामनेरमध्ये असेच लोकांची फसवणूक केलेली आहे. हे लोक नशेच्या आहारी गेलेले असून त्यांना दारूचे व्यसन जडलेलं आहे. त्यांच्या या उद्योगामुळे सदर तरुणांचे कुटुंबियांनी देखील त्यांना रस्तावर आणलेले आहे, शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे यापूर्वीच निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत.
- मंत्री गिरीश महाजन

Tendernama
www.tendernama.com