सिंहस्थापूर्वी सप्तशृंगी गडाचा पर्यायी रस्ता होणार का? १.५५ कोटींचा सर्वेक्षण प्रस्ताव का रखडला?

चंडीकापूरमार्गे प्रस्तावित पर्यायी मार्गासाठी १ कोटी ५५ लाखांचा निधी मागणी प्रस्ताव सहा महिन्यांपासून प्रलंबित; सिंहस्थापूर्वी सर्वेक्षण होणार का?
Saptashrungi Gad
Saptashrungi GadTendernama
Published on

नाशिक (Nashik): सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी गडाच्या घाटातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठीपर्यायी चंडीकापूर मार्गे रडतोंडी घाटरस्ता प्रस्तावित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण, भूसंपादन, वनजमीन संपादन, भू-तांत्रिक तपासणी, आराखडा व अंदाजपत्रकासाठी तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ५५ लाख ३७ हजार २३३ रुपये निधी मिळावा, असा निधी मागणी प्रस्ताव तयार करून सहा महिन्यांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. मात्र, या सर्वेक्षणासाठी अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे या सिंहस्थापूर्वी या रस्त्याचे सर्वेक्षण तरी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Saptashrungi Gad
सिंहस्थापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट; रस्ते, चौक अन् प्रवेशद्वारांना ‘थीम बेस्ड’ लूक

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड हे देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक गडावर येतात. गडावर जाण्यासाठी नांदूरीमार्गे एकच घाट रस्ता आहे. या घाटात पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता निसरडा होणे आणि वाहतूक विस्कळित होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे गडावर सुरक्षित वाहतुकीसाठी पर्यायी घाटरस्ता उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

ही मागणी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या नवीन रस्त्यासाठी सर्वेक्षण करण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालय व सिंहस्थ प्राधिकरण यांच्याकडे पाठवला आहे.

Saptashrungi Gad
सिंहस्थासाठी आणखी १,८०० कोटींचा निधी; ३० टक्क्यांहून अधिक काम करणाऱ्या ठेकेदारांना दिलासा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावानुसार प्राथमिक सर्वेक्षण, ट्रायल पिट, ड्रोन सर्वेक्षण, टोटल स्टेशन सर्वेक्षण, नाल्यांचे सर्वेक्षण, भू-अभियांत्रिकी व मृदा तपासणी, रस्त्याचा सविस्तर आराखडा, भौमितिक रचना, संरेखन, ऑटोकॅड रेखांकन तसेच भूसंपादन व वनजमीन संपादनासाठी आवश्यक कार्यवाही या बाबींचा समावेश आहे.

या सर्व बाबींसाठी सर्व करांसहित साधारण एक कोटी ५५ लाख ३७ हजार २३३ रुपये निधी अपेक्षित आहे. त्यात सर्वेक्षणासाठी २८ लाख ३४ हजार ३६२ रुपये, भूसंपादनासाठी ८१ लाख ८६ हजार ९५१ रुपये, भू-तांत्रिक व मृदा सर्वेक्षणासाठी ५ लाख ६३ हजार ६५९ रुपये आणि डिझाइन, अंदाज व रेखांकनासाठी १४ लाख ७१ हजार ५२६ रुपये प्रस्तावित आहेत.

Saptashrungi Gad
Nashik: सिंहस्थातील ३ रस्त्यांच्या गुणवत्तेवर आयआयटी मुंबईची मोहोर; महापालिकेला दहापैकी दहा गुण

पर्यायी मार्गाची गरज
घाटरस्त्याच्या दुरुस्ती कामांमुळे सध्या हा रस्ते शनिवार व रविवार वगळता इतर पाच दिवस २६ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाने सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच नवरात्रोत्सवातही या रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असते. यातून पर्यायी रस्त्याची गरज अधोरेखित होत आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडाकडे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सिंहस्थ प्राधिकरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. नाशिक ते वणी रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष गडावर जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने गर्दीचे नियोजन कसे होणार हा प्रश्न आहेच.

Saptashrungi Gad
नाशिकमध्ये शहरातील आणखी ३७ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये

लोकप्रतिनिधींचीही पाठ?
पर्यायी घाटरस्त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे तसेच आमदार नितीन पवार यांच्याकडून यासाठी फारसा पुढाकार घेतला जात नसल्याचे बोलले जात आहे. कोणीही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत नसल्याने जिल्हा प्रशासनही या प्रस्तावाबाबत निर्णय घेत नसल्याचे बोलले जात आहे.

Saptashrungi Gad
द्वारका ते नाशिकरोड 10 पदरी रस्त्याचे काय झाले? 6 महिन्यांपासून टेंडर-टेंडरचा खेळ

Key Points

  • चंडीकापूरमार्गे रडतोंडी घाटातून सप्तशृंगी गडासाठी पर्यायी रस्ता प्रस्तावित,

  • सर्वेक्षण, भूसंपादन व आराखड्यासाठी १ कोटी ५५ लाख ३७ हजार २३३ रुपयांचा निधी अपेक्षित,

  • निधी मागणीचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून सिंहस्थ प्राधिकरण आणि जिल्हा नियोजन समितीकडे,

  • सध्या घाटरस्ता २६ सप्टेंबरपर्यंत आठवड्यातील पाच दिवस बंद,

  • सिंहस्थ २०२७च्या पार्श्वभूमीवर पर्यायी रस्त्याच्या सर्वेक्षणाला गती मिळणार का, प्रश्न,

Tendernama
www.tendernama.com