Nashik : रस्ते खोदकामांमुळे नागरिक त्रस्त; महापालिकेकडे 200 तक्रारी

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : शहरात वेगवेगळ्या कामांसाठी रस्त्यांवर व रस्त्यांच्या कडेने खोदकाम सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटणे, पथदीपांच्या वीजतारा उखडणे आदी प्रकार घडले आहेत. यामुळे रस्त्यांवर पाणीचपाणी होऊन कमी दाबाने पुरवठा होणे, पथदीप बंद पडल्याने नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय होत असल्याने नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात मोठ्याप्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये महापालिकेकडे या गैरसोयीच्या दोनशे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Nashik Municipal Corporation
Mumbai News : मुंबईकरांसाठी आली चांगली बातमी; 'ते' पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. तसेच महानगर गॅस निगम लिमिटेडकडून घरपोच गॅस पुरवण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. तसेच शहरातील सर्व सिग्नलवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवली असून या यंत्रणेला ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यासाठी चौकाचौकात खोदकााम करण्यात आलो होते. त्यातच या खोदकामांमुळे महावितरणाचा पुरवठाही शहरात अनेक ठिकाणी खंडित होत होता. याशिवाय अनेक ठिकाणी खासगी इमारतींची कामे सुरू असून त्यासाठी सुरू असलेल्या खोदकामंमुळेही भूमिगत तारा तुटल्या आहेत. गॅसपाईप लाईनच्या खोदकामांमुळेही भूमिगत तारा तुटल्यामुळे नागरिकांना असह्य उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे महापालिकेकडे या गैरसोईबाबत नागरिक मोठ्याप्रमाणावर तक्रारी करीत असून महापालिकेकडून त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, त्यात फारसा फरक पडत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ही कामे पूर्ण होईपर्यंत महापालिकेलाही काही उपाययोजना करता येत नसून ती कामे पूर्ण झाल्यानंतरच गैरसोय दूर करण्यात येईल, असे महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सांगितले जात आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

शहरात विशेषत: गॅस पाईपलाईनसाठी गेले दोन वर्षांपासून उन्हाळ्यात रस्ते खोदकाम केले जात असून खोदकाम करण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदत दिली जाईल व ३१ मेपर्यंत रस्ते पूर्ववत केले जातील, असे महापालिकेच्या प्रशासकांकडून दरवर्षी आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. यावर्षीही जून सुरू झाला, तरी अजूनही खोदकाम सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे पावसाळ्यात नागरिकांना पुन्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. रस्ते खोदकाम करीत असलेल्या कंपनीकडून मेमध्ये रस्ते दुरुस्ती करणे अपेक्षित असताना त्यांनी मेमध्येही खोदकाम सुरू ठेवल्यामुळे आता रस्त्यांची दुरुस्ती करण्यास वेळ मिळणार नाही. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य ओरड लक्षात घेऊन महापालिकेने आता खोदकाम करण्यात आलेली जागा पूर्ववत केली की नाही याची तपासणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com