Mumbai News : मुंबईकरांसाठी आली चांगली बातमी; 'ते' पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

Gokhale Bridge
Gokhale BridgeTendernama

Mumbai News मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे (Gokhale Bridge) काम प्रगतीपथावर आहे. सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी गोखले पुलाची उंची जोडण्याचे काम अतिशय वेगात सुरू आहे. उर्वरित कामे जलदगतीने करून हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले.

Gokhale Bridge
सरकारचा मोठा निर्णय; 'एक राज्य- एक गणवेश'साठी निघाले 126 कोटींचे टेंडर

मुंबई महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी अंधेरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गोखले पूल प्रकल्पाच्या ठिकाणी कार्यरत अभियंत्यांशी आयुक्तांनी संवाद साधत उरलेली कामे जलदरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दोन्ही पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मुंबईकरांसाठी हा टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, या पाहणी दौऱ्याच्या प्रारंभी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे भेट दिली. सांताक्रुझ येथील बाल उद्यानात गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अधिकारीही उपस्थित होते.

Gokhale Bridge
Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानाला भेटीप्रसंगी त्यांनी उद्यानात व्यायामासाठी आलेल्या मुंबईकरांशी संवाद साधला. उद्यानात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. तसेच उद्यानात दररोज स्वच्छता करा, वाढलेल्या गवताची कापणी करा, उद्यानात साचणाऱ्या कचऱ्याची दैनंदिन विल्हेवाट लावा, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक नेमावेत, आदी सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या.

जुहू येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रुस्तम नरसी महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (कूपर हॉस्पिटल) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाला देखील आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट दिली.

आलेल्या रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांविषयी माहिती दिली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com