Nashik Railway Infra Boost: नाशिक रेल्वे स्थानकांवर मेगा तयारी; इगतपुरी-लासलगावलाही होणार फायदा

सिंहस्थ 2027: नाशिक परिसरात ₹1,455 कोटींचे रेल्वे प्रकल्प; 7 स्थानकांचा विकास; लूप लाइन, प्लॅटफॉर्म, होल्डिंग एरिया उभारणी; सर्व कामे 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण
Nashik Railway Infra Boost
Nashik Railway Infra BoostTendernama
Published on

नाशिक (Nashik): 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून नाशिक परिसरात ₹1,455 कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात असून, 7 प्रमुख स्थानकांचा विकास केला जाणार आहे. सर्व कामे 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Nashik Railway Infra Boost
Nashik ZP: सिंहस्थाची कामे जिल्हा परिषदेकडून नकोत; कोणी केली मागणी?

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुमारे १,४५५ कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक परिसरातील नाशिकरोड, देवळाली, ओढा, सुकेणे, खेरवाडी, इगतपुरी व लासलगाव या स्थानकांवर लूप लाइन वाढवणे, प्लॅटफॉर्म सुविधी उभारणे ही कामे केली जात असल्याचे म्हटले आहे.

सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकरोड, देवळाली, ओढा, सुकेणे, खेरवाडी याच स्थानकांच्या कामांचा समावेश असाताना आता मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीच लासलगाव व इगतपुरी या रेल्वेस्थानकांचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nashik Railway Infra Boost
Simhastha Mahakumbh Nashik : सिंहस्थातील आणखी 4100 कोटींच्या कामांना मान्यता

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन नाशिक -त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच या सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केली जातील, असेही स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, गर्दी व्यवस्थापनाच्या या आराखड्याचा भाग म्हणून नाशिकरोड, देवळाली, ओढा, सुकेणे, खेरवाडी, इगतपुरी व लासलगाव या प्रमुख स्थानकांवर होल्डिंग एरिया (थांबण्यासाठी जागा) तयार करण्यात येणार आहेत. त्यातील देवळाली, लासलगाव, नाशिक रोड, ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी ही स्थानके गर्दी व्यवस्थापनासाठी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय इगतपुरी आणि साईनगर शिर्डी स्थानकांचाही या विकासकामांसाठी समावेश करण्यात आला आहे.

इगतपुरी हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, तर शिर्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक केंद्र आहे, यामुळे या स्थानकांचाही विकास करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik Railway Infra Boost
Nashik: सिंहस्थासाठी रेल्वेकडून 5 स्थानकांवर 1200 कोटींची कामे

सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सीसीटीव्ही, उद्घोषणा प्रणाली, प्रवासी वाहतूक व्यवस्थापन, तसेच रेल्वेगाड्यांच्या आगमन व निर्गमनाचे वेळापत्रक ठरवणे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रवासी कसे स्थानकांवर पोहोचणे, तेथून कुंभस्नानासाठी जाणे व तेथून परतल्यानंतर पुन्हा रेल्वेगाडीने गंतव्यस्थानी जाणे याबाबतचा एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने ८८ कामांसाठी १३७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही सर्व कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढविणे आणि मार्ग क्षमता मजबूत करण्याच्या कामांवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Nashik Railway Infra Boost
Nashik Ring Road बाबत मोठी अपडेट; 20 टक्के शेतकरी थेट खरेदीने जमीन देण्यास तयार

देवळाली, नाशिक रोड, लासलगाव आदी स्थानकांवर या अंतर्गत लूप लाइन वाढविणे, प्लॅटफॉर्म सुविधा सुधारणे तसेच प्रवासी व्यवस्थापनाशी संबंधित कामे सुरू आहेत. भुसावळ आणि साईनगर शिर्डी स्थानकांवरही सुविधा विस्ताराची कामे हाती घेण्यात आली असून, ही सर्व कामे २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

कुंभमेळा २०२७ साठी १४५५ कोटी रुपयांचे प्रकल्प

नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी, सुकेणे, लासलगाव येथे सुविधा वाढ

इगतपुरी व साईनगर शिर्डी स्थानकांचा विस्तार

२०२७ पूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com