Nashik : महापालिका मार्चमध्ये खरेदी करणार 25 इलेक्ट्रिक बसेस

Electric bus
Electric busTendernaam

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक बसच्या ताफ्यात लवकरच २५ इलेक्ट्रिक बस सहभागी होणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक, मंडळाची दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या इलेक्ट्रिक बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून अनुदान देण्याबाबत होकार न आल्यामुळे महापालिकेने इलेक्ट्रिक बसेसची संख्या ५० वरून घटवून ती २५ केली असून मार्चमध्ये याबाबतची खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Electric bus
Mumbai : अदानींकडील धारावीच्या टेंडरमध्ये पक्षपात; कोणी केला आरोप?

केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन- कॅप योजना सुरू केली. आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला असून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून ४० कोटींचे अनुदानदेखील प्राप्त झाले आहे. या अनुदानातून विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दरम्यान एन कॅप योजनेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजनांकरिता निधी वापरण्याची अट असून, ही अट बदलून सर्व निधी केवळ इलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठीच उपलब्ध व्हावा यादृष्टीने पालिकेचा यांत्रिकी व पर्यावरण विभाग हा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला.

Electric bus
Nashik ZP: 15 दिवसांत केवळ 1 टक्का निधी खर्च; मग 99 कोटींचे काय?

नाशिक महानगर परिवहन महामंडळाने जुलै २०२१ पासून 'सिटीलिंक बससेवा सुरू केली असून त्यात शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवाशी वाहतूक सेवा पुरवली जात आहे. दरम्यान, महापालिकेने पर्यावरणपूरक बससेवेकरता ५० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव केंद्राच्या 'फेम २' योजनेंतर्गत केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला होता. त्यासाठी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असे बससेवा उद्घाटन कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार महापालिकेने प्रति ईलेक्ट्रिक बसमागे ५५ लाख रुपये अनुदान अपेक्षित होते.

Electric bus
Nashik: एकाच्या वादामुळे 194 कामांचे फेरवाटप; ठेकेदारांची डोकेदुखी

मात्र, महापालिकेला फेम-२ दोनच्या नियमानुसार टेंडरमधील अटी-शर्ती बसवणे शक्य झाले नाही. यामुळे या योजनेतून बसखरेदीसाठी अनुदान मिळण्यात अडचणी आल्या. फेम २ योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव अडचणीत असल्याचे बघून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आता एन कॅप योजनेतून बसेससाठी अनुदान मिळवता येईल का, यादृष्टीने चाचपणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. एन कॅप योजनेतून वर्षाला २० कोटी रुपयाचा निधी पालिकेला हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी झाल्या, तर हवा प्रदूषण कमी होणार असल्याचा संदर्भ यासाठी दिला जाणार असून या योजनेतून ५० ऐवजी २५ इलेक्ट्रिक बससाठी निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. आता या निधीतूनच २५ इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com