Nashik : नाशकातील वृक्षगणनेसाठी यंदा दुप्पट खर्च; 5 कोटींची...

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महानगरपालिका हद्दीतील वृक्षांची गणना करण्याचे यापूर्वीचे टेंडर (Tender) वादात असून, न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असतानाच यंदाच्या अंदाजपत्रकात महापालिकेने वृक्षगणनेसाठी पाच कोटींची तरतूद केली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या वृक्षगणनेचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

Nashik
Nashik : 'ते' 21 कोटी आणायचे कोठून? नाशिक महापालिकेने PM मोदींना का लिहिले पत्र?

नाशिक महापालिका हद्दीत महापालिका, नागरिक तसेच इतर सरकारी विभागांनी त्यांच्या कार्यालयात केलेल्या वृक्षलागवडीमुळे वृक्षांची संख्या मोठी आहे. यापूर्वी नाशिक महापालिकेने २०१६ मध्ये वृक्ष गणना केली होती. त्यावेळी मुंबईच्या ठेकेदाराला नाशिक शहरातील वृक्षगणनेचे काम दिले होते. ते काम देताना नाशिक शहरात २५ लाख वृक्ष असतील, असे गृहित धरून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी ८.५० रुपये प्रतिवृक्ष याप्रमाणे दोन कोटी १३ लाख ७५ हजार रुपये खर्च महापालिकेला अपेक्षित होता.

Nashik
MGNREGA : राज्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे 671 कोटी चार महिन्यांपासून थकले

प्रत्यक्ष वृक्षगणना झाली तेव्हा, नाशिक शहरात ४९ लाख वृक्ष असल्याची आकडेवारी मक्तेदाराकडून सादर करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यात पोलिस अकादमी व लष्करी हद्दीतील वृक्षगणना संरक्षणाच्या कारणामुळे करण्यात आली नव्हती.

दरम्यान, मक्तेदाराला महापालिकेडून १.९० कोटी रुपये अतिरिक्त अदा करणे अपेक्षित असताना महापालिका ही रक्कम देत नसल्याने मक्तेदाराने न्यायालयात धाव घेतली. मक्तेदाराने त्याच्याकडील कागदपत्र न्यायालयासमोर मांडत टेंडरमधील अटी- शर्तीनुसारच वृक्षगणना केल्याचे म्हणणे मांडले आहे.

Nashik
Swachh Bharat Mission : राज्यातील बाराशे कोटींची 'ती' कामे केवळ 69 ठेकेदारांना आंदण; कारण काय?

न्यायालयात हा वाद प्रलंबित असतानाच वृक्षप्राधिकरणाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन वृक्षगणनेसाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वृक्षसंवर्धनाच्या जुन्या कामांसाठी २.४० कोटी, नवीन वृक्षसंरक्षक जाळ्यांसाठी ६० लाख, जुने वृक्षसंरक्षक दुरुस्तीसाठी २० लाख, खत, माती खरेदीसाठी पाच लाख, नर्सरी बाबींसाठी पाच लाख, नर्सरी सुधारण्याकरिता ५१ लाख, रोपे खरेदीसाठी पाच लाख, कुंड्या खरेदीसाठी १० लाख, वृक्षप्राधिकरण वाहन खरेदीसाठी ९० लाख, पुष्पोत्सवासाठी ४५ लाख, तसेच वृक्ष पुनर्रोपणासाठी ५० लाख रुपये अशी तरतूद आहे.

Nashik
Nashik : सिटीलिंक, पेस्टकंट्रोल पाठोपाठ आता 'या' ठेक्याचीही विभागणी

दर पाच वर्षांनी वृक्षगणना
महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम तरतुदीनुसार पाच वर्षांतून एकदा वृक्षांची गणना करणे महापालिकेला बंधनकारक आहे. महापालिकेने विविध रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावली असून, विविध खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात तसेच शाळा, कॉलेज, दवाखाने, मैदाने या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. प्रत्येक पाच वर्षांनी एकदा वृक्षगणना करणे पालिकेला बंधनकारक आहे. मात्र, मधल्या काळात कोरोनामुळे वृक्षगणना रखडली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com