GIS Mapping: नाशिकमध्ये गोदावरी आणि उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) सध्या स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदावरी स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी प्रोजेक्ट गोदा हा प्रकल्प राबवला जात असून तो अंतिम टप्प्यात असतानाच केंद्र सरकारने नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच सौंदर्यीकरण करण्यासाठी 'नमामि गोदा' प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली आहे.

Nashik
Solar Energy : TATA 'येथे' उभारणार पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प

सध्या नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये दुबार कामे होऊ नयेत, यासाठी नाशिक महापालिकेने गोदावरीसह उपनद्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नमामि गोदा प्रकल्पाचा बेस मॅप तयार केला जाणार आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने महापालिकेकडूनदेखील गोदाघाट परिसरात कामे होणार आहे. यासाठीही या जीआयएस मॅपिंगचा फायदा होऊ शकणार आहे.

Nashik
BMC : स्वतःला विकलं तेवढं पुरे आता मुंबईला विकू नका : आदित्य ठाकरे

महापालिकेच्या नगर नियोजन विभागामार्फत शहरातील मालमत्ता, सार्वजनिक रस्ते, मिळकती नैसर्गिक नाले आदीचे ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस)च्या माध्यमातून मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. या मॅपिंगमुळे महापालिकेच्या सर्व मिळकती डिजीटल पद्धतीने कार्यालयात बसूनही समजू शकणार आहे. याच पद्धतीने महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कामांचेही मॅपिंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Nashik
मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 15 मिनिटांत; नोव्हेंबरचा मुहूर्तही ठरला

सध्या महापालिकेकडून गोदावरी स्वच्छतेसाठी प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबवला जात आहे. त्यानंतर नमामि गोदाच्या माध्यमातूनही गोदावरी व तिच्या उपनद्यांवर कामे केली जाणार आहेत. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्तही महापालिका गंगा घाट परिसरात कामे करणारआहे. यामुळे या सर्व कामांचे जीआयएम मॅपिंग केल्यास भविष्यात दुबार कामे होऊ शकणार नाहीत. तसेच कोणताही नवीन प्रकल्प करताना यापूर्वी तेथे झालेली कामे जीआयएस मॅपिंगद्वारे दिसू शकणार आहे. यामुळे नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम नमामि गोदा प्रकल्पासाठी देखील जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने मिळकत विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

Nashik
नाशिक महापालिकेत 2800 जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीसह पाच उपनद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी नमामि गोदा प्रकल्पात उपाययोजना केल्या जाणार असून यापूर्वीही त्यादृष्टीने महापालिकेने कामे केली आहेत. तसेच सिंहस्थाच्या निमित्ताने महापालिकेकडून गोदावरीच्या स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च केले जातील. याशिवाय स्मार्टसिटी कंपनीकडून प्रोजेक्ट गोदा हाती घेण्यात आला आहे. यात गोदावरीचे सुशोभीकरण केले जात आहे. नमामि गोदा प्रकल्पातदेखील गोदावरी सौंदयकरण व प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. या वेगवेगळ्या यंत्रणांकडून कामांचे प्रस्ताव तयार करताना दुबार कामे प्रस्तावित करू नये, यासाठी या जीआयएस मॅपिंगचा फायदा होऊ शकणार आहे. सध्या जीआयएस मॅपिंग काम अक्षय इंजिनिअरच्या माध्यमातून होत आहे.

Nashik
BMC नालेसफाईसाठी जानेवारीतच इन ऍक्शन; १८० कोटींची टेंडर प्रसिद्ध

महापालिकेच्या माध्यमातून गोदावरी नदी व उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील वीस वर्षांचा विचार करून मलनिस्सारण योजनेचा सर्वकष अभ्यास करून प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवणे, त्यासाठी संपूर्ण योजनेचा बेस तयार करणे, अस्तित्वातील मलवाहिका नव्याने टाकणे, अस्तित्वातील पंपिंग स्टेशन व मलनिस्सारण केंद्राची क्षमता वाढवणे किंवा नवीन मलनिस्सारण केंद्राची उभारणी करणे, नद्यांच्या तीरावर घाट बांधणे, सुशोभीकरण करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे आदी कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी जीआयएस मॅपिंग झाल्यानंतर कोणत्याही योजनेतून काम करायाचे असल्यास दुबार कामे टाळता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com