नाशिक महापालिकेत 2800 जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Job Alert
Job AlertTendernama

नाशिक (Nashik) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नाशिक महापालिकेतील २८०० रिक्त पदांची भरती होण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महापालिका प्रशासनाकडून प्रशासन, लेखा, तांत्रिक विभागातील मंजूर पदांसासाठी नियमावली मंजूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Job Alert
औरंगाबादेत संताप; रस्त्यांवरील पॅचवर्कच्या दर्जावरून खाबुगिरी उघड

नाशिक महापालिका 'क' वर्गात असताना तयार केलेल्या आकृतीबंधानुसार सध्या महापालिकेत ४३०० कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका 'ब' वर्गात पदोन्नती होऊन बरीच वर्षे उलटली तरी 'क' वर्गाचे जुनेच आकृतीबंध आजही कायम आहेत. महापालिकेच्या नव्या आकृतीबंधानुसार विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ७०८४ मंजूर पदांपैकी जवळपास २८०० पदे रिक्त आहेत. यामुळे केवल ४३०० कर्मचाऱ्यांकडून महापालिकेचे कामकाज केले जात आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे महापालिकेला अनेक गोष्टी आउटसोर्सिंगद्वारे कराव्या लागत असून घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुलीचेही आउटसोर्सिंग करण्याचा विचार सुरू आहे.

Job Alert
मुंबईकरांना वरदान ठरणाऱ्या 'या' मेट्रो सेवांचे मोदी करणार लोकार्पण

मनुष्यबळाअभावी महापालिकेला नागरिकांना सेवासुविधा पुरवताना मर्यादा येत आहेत. यामुळे नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर महापालिकेने सुधारित आकृतीबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने त्यातील ८७५ नवीन पदांना मंजुरी देखील दिली होती. मात्र, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांच्या भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. त्यात नुकतेच नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे. यामुळे या पदांच्या भरतीसाठी महापालिकेकडून तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात असून या पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या संस्थेसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे. या कराराला सध्या आचरसंहितेचा अडथळा असल्यामुळे फेब्रुवारीत हा सामंजस्य करार झाल्यानंतर महापालिकेत ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Job Alert
लोकप्रतिनिधींच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे जलजीवनमध्ये नाशिक पिछाडीवर

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषदेत ४० हजार रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली. त्यामुळे नाशिक महापालिकेतील २८०० रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिक्त पदांची माहिती सादर केल्यानंतर भरतीसाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आता आस्थापना, वित्त व लेखा, लेखापरीक्षण विभाग आणि तांत्रिक संवर्गांमधील सर्व पदे भरण्यासंदर्भातील सेवा प्रवेशनियमावली मंजुरीसाठी नगरविकासकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com