Nashik : सारूळच्या वादग्रस्त खाणपट्ट्यांचे उत्खनन बंद

Sand Mining
Sand MiningTendernama

नाशिक (Nashik) : तालुक्यातील सारूळ शिवारातील वादग्रस्त खाणपट्ट्यांबाबत जिल्हा प्राधिकरणासमोर सुरू असलेली सुनावणी जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवायची व त्या कालावधीत उत्खनन सुरूच ठेवण्याचा प्रयत्न खाणपट्टाचालकांकडून होत असल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. यामुळे सुनावणी पूर्ण होईपर्यंत सारुळमधील सात व राजुरबहुला येथील एक अशा आठ खाणपट्ट्यांतील उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारचे यांनी दिले आहेत.

Sand Mining
''धारावी' टेंडरमध्ये 2000 कोटींचा चुना; अटी-शर्थींमध्ये हेराफेरी'

नाशिक तालुक्यातील सारूळ शिवारातील गौणखनिज उत्खननाचे खाणपट्टे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. तसेच करारनाम्यातील अटी, शर्तींचा भंग करत या ठिकाणी उत्खनन सुरूअसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाविरोधात झाल्या. यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश महिनाभरापूर्वी काढले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या चमूने पाहणी करून अहवाल सरकारला सादर केला आहे. यानंतर सरकारने केंद्राच्या समितीला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला आहे.

Sand Mining
Nashik ZP : यंदा विक्रमी 95 टक्के निधी खर्च होणार?

दरम्यान, जिल्हा प्राधिकरणाने ३ मार्च रोजी काढलेल्या अंतिम आदेशाविरुद्ध  उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करणार असल्याचे खाणपट्टाचालकांकडून सुनावणीत तोंडी सांगण्यात आले होते. त्यासाठी सुनावणीची मुदत वाढवून देण्याची विनंतीही केली होती; मात्र, त्यासाठी कोणताही अर्ज प्राधिकरणापुढे सादर केलागेला  नाही. प्राधिकरणाने वेळ देऊन देखील २१ मार्चपर्यंत आव्हान याचिका दाखल केल्याची प्रत अथवा मुदत वाढवून मिळावी या अर्जाची प्रत खाणपट्टेचालकांकडून प्राधिकरणाला दिली गेली नाही. यामुळे  खाणपट्टेधारक जाणून बुजून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्राधिकरणचे मत झाले. खाणपट्टेधारक या प्रकरणातील वस्तुस्थिती प्राधिकरणासमोर येण्यापूर्वी जागेवर होत असलेले उत्खनन सुरूच ठेवण्यासाठी सुनावणी लांबवत असल्याचा ठपका बाबासाहेब पारधे यांनी अंतिम आदेशात ठेवला आहे.

Sand Mining
Nashik : वाराणसी-प्रयागराजप्रमाणे सिंहस्थात उभारणार 'या' सुविधा

हे खाणपट्टे बंद ठेवण्याचे आदेश

१) शुभांगी बनकर  गट क्रमांक १३९ ( सारुळ)

२) सिरिल फ्रान्सिस रॉड्रिग्ज गट क्रमांक १२९(सारूळ)

३) हरिभाऊ फडोळ गट क्र. १४०/२ (सारूळ) 

४) श्रीराम स्टोन क्रशर कंपनी गट क्र. १२६/१ (सारुळ) 

५) गणेश स्टोन मेटल कंपनी गट क्र. १२/१ (राजुर बहुला

६) जमुना इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि गट क्र.१५/२ (सारूळ)

७) मे. भगवती अर्थ मुव्हर्स गट क्र. १३८/८

(८) प्रताप जोशी गट क्र. १२६/१(सारूळ)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com