Nashik : अडचणीत पुन्हा एकलहरे वीजनिर्मिती केंद्राचा राज्याला आधार

Eklahare Thermal power plant
Eklahare Thermal power plantTendernama

नाशिक (Nashik) : विदर्भातील कोराडी येथील दोन संच व इतर दोन ठिकाणचे काही वीजनिर्मिती संच बंद पडल्याने एकलहरे येथील वीज केंद्रातील तिसरा संच महानिर्मितीने दोन दिवसांपूर्वी सुरू केला आहे. यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून सध्या ४४० मेगावॅट वीज तयार होत आहे. एरवी एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राबाबत उदासीन धोरण ठेवणाऱ्या राज्याला अडचणीच्या काळात एकलहरे केंद्राने हातभार लावला आहे. एकलहरे केंद्राचे वीज वितरणाच्या दृष्टीने स्थान लक्षात घेता या केंद्राचा विस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Eklahare Thermal power plant
राज्यातील 88 हौसिंग प्रोजेक्ट रद्दचा प्रस्ताव; सर्वाधिक पुण्यात

उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यातील विजेची मागणी वाढती आहे. सध्या २८ हजारावर मेगावॉट मागणी असते. अशात कोराडी येथील ६६० चे २ संच बॉयलर ट्युब लिकेज मुळे बंद आहे, तर नाशिकच्या एका संचाचा कोळसा ज्या आयडियल कंपनीला वळवण्यात आला होता तो संचही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने नाशिकचा तिसरा संच सुरू करण्यात आला. हा संच सुरू करण्यासाठी मुख्यालयाकडून व भातसा विज प्रकल्प येथून मनुष्यबळ बोलावण्यात आले आहे.

Eklahare Thermal power plant
Sambhajinagar : महामार्गावरील 613 कोटीच्या दुरूस्तीनंतरही खड्डेच..

एकलहरे येथील तिन्ही संच २०२० मध्ये बंद होते. त्याच काळात मुंबई अंधारात बुडाली असताना एकलहरे संच बंद असल्याने नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी एकलहरे केंद्राचे महत्व लक्षात येऊन युद्ध पातळीवर संच सुरू करण्यात आले व मुंबईत दिवे पेटले. राज्यात आजही आणीबाणीची वेळ आली तर एकलहरे वीज निर्मिती केंद्र महत्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे राज्यातील इतर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील काही संच बंद पडल्याने एकलहरे केंद्रातील तिसरा संच सुरू करण्यात आला आहे.

Eklahare Thermal power plant
Nashik : 30 टक्केच देयकांमुळे रखडणार जलजीवनची कामे

आजवर महानिर्मिती कंपनी अडचणीत सापडली, त्या प्रत्येक वेळी नाशिकने महत्वाची  कामगिरी बजावली आहे. नाशिक एकलहरे केंद्राने २०१६ पर्यंत सलग चार वर्ष पूर्ण क्षमतेने वीज निर्मितीत प्रथम तीन क्रमांकावर स्थान अबाधित ठेवले होते. येथील संच आता चाळिशीच्या उंबरठ्यावर असल्याने येथील प्रस्तावित संच ६६० मेगावॉट होणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय इच्छाशक्ती अभावी तो प्रकल्प बारगळला आहे.  राज्याची आजची विजेची मागणी २६७०० मेगावॅट आहे, तर महानिर्मिती आणि खासगी कंपन्या मिळून १६४०७ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहेत. यामुळे उर्वरित विजेची गरज नॅशनल ग्रीडमधून भागवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com