Nashik : शहराजवळच्या त्या ग्रामपंचायतीमधील रहिवाशांचे दिवस पालटणार; कारण...

चांदसी शिवारात ११ कोटी रुपयांच्या निधीतून चार किलोमीटर सिमेंट काँक्रिटचे रस्ते उभारण्यात येणार
Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिका हद्दीलगत असलेल्या चांदशी ग्रामपंचायत हद्दीतील नागरी वसाहतीत रस्ते, सांडपाणी व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहरालगत असूनही तेथे ग्रामीण भागापेक्षाही दुरवस्था आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरणने अखेर येथील रहिवाशांच्या समस्येची दखल घेतली आहे.

Nashik
Nashik: नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; 'हा' भाग वगळला

चांदसी शिवारात ११ कोटी रुपयांच्या निधीतून चार किलोमीटर सिमेंट काँक्रिटचे रस्ते उभारण्यात येणार असून त्याचे टेंडरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एनएमआरडीएच्या पाच कोटींच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांसाठी वणवण करणा-या तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक महापालिका शेजारील चांदसी, जलालपूर, जानोरी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक नागरिकांनी घरे, घेतली आहेत. हा भाग भौगोलिदृष्ट्या नाशिक शहरात असला तरी तांत्रिकदृष्ट्या तो संबंधित ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे. या भागातील घरबांधणीला परवाने देण्याचे काम नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण करीत असते. यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीला त्याचे उत्पन्न मिळत नाही.

तसेच नाशिक महापालिका हद्दीलगतच्या या दाटवस्तीमध्ये पायाभूत सुविधा उभारणे ग्रामपंचायतींना शक्य नसते. कारण ग्रामपंचायतींना ना तितके उत्पन्न आहे ना तांत्रिक पाठबळ. यामुळे महापालिका हद्दीलगत राहणा-या नागरिकांना कायम असुविधांचा सामना करावा लागत आहे.

Nashik
Eknath Shinde: ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार! असे का म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

महापालिका हद्दीलगत असल्याने महापालिका हद्दीतील मालमत्तांप्रमाणे दर देऊन घरे विकत घेतली. मात्र, सुविधा काहीच नाही, या परिस्थितीचा ते सामना करीत आहेत. अशीच परिस्थिती नाशिक महापालिका हद्दीतील आनंदवल्लीलगत गोदावरीच्या पलिकडील चांदसी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांची आहे. या भागातील कोणतीही इमारत, घर बांधण्यासाठी एनएमआरडीएकडून परवानगी घेतली जाते. त्याचे शुल्क एनएमआरडीएला मिळते. त्या शुल्काचा उपयोग एनएमआरडीए कशासाठी करते? त्या रकमेतून रहिवाशांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली जात होती.

अखेर नाशिकचे जिल्हाधिकारी असलेले जलज शर्मा हे एनएमआरडीएचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी या महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांना सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nashik
Simhastha Kumbh Mela: प्रशासन घाईकुतीवर; आधी 80 टक्के मोबदला देऊन जागा ताब्यात घेणार नंतर दर ठरवणार

एनएमआरडीएने चांदसी शिवारात गोदावरीलगत राहत असलेल्या जवळपास तीन हजार नागरिकांसाठी चार किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते मंजूर केले असून त्याचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. यामुळे चांदसी शिवारातील ७० टक्के रहिवाशांचा पक्क्या रस्त्यांच प्रश्न सुटणार असल्याचे अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले. तसेच या नागरी वसाहतीमधील सांडपाणी व्यवस्थापन हा गंभीर विषय आहे. प्रत्येक इमारत अथवा घरातील सांडपाणी, सेप्टिक टॅकमधील पाणी जमिनीत मुरून ते उताराच्या दिशेने नाल्यांमध्ये जाते व तेथून ते उताराने गोदावरी पात्रात जाते. यामुळे गोदावरीचा प्रवाह प्रदूषित होत असतो.

Nashik
Nashik: पेठ बसस्थानकाचे बांधकाम पाडण्याचे आदेश; काय आहे कारण?

ही समस्या ओळखून एनएमआरडीएने आता चांदसीच्या नागरी वसाहतीमध्ये पाच कोटी रुपयांचा मिनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळून टेंडर प्रक्रिया राबवली जाईल.

या प्रकल्पामुळे या भागातील उघड्या गटारींमध्ये सोडून देण्यात आलेले सांडपाणी पाईपलाईनमधून एकत्र केले जाईल. तेथून ते एकत्र केलेले सांडपाणी व मलजल एका पाईपलाईनमधून नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रांच्या मुख्य पाईपलाईनला जोडले जाणार आहे. यामुळे चांदसी शिवारातील सांडपाणी थेट गोदावरीत न मिसळता ते मलनिस्सारण केंद्रात जाऊन त्यावर प्रक्रिया होऊनच ते गोदावरीत सोडले जाणार आहे. यामुळे गोदावरी प्रदूषणाला अटकाव बसणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com