Nashik : अंजनेरी-ब्रह्मगिरी दरम्यान होणार 376 कोटींचा रोपवे

Ropeway
RopewayTendernama

नाशिक (Nashik) : श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी व गौतमी-गोदावरीचे उगमस्थान असलेले ब्रह्मगिरी पर्वत रोपवेने जोडले जाणार आहेत. जवळपास ३७६.७३ कोटींच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीकडून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ३१ जुलैपर्यंत टेंडर मागवण्यात येणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ब्रह्मगिरी व अंजनेरी या पर्वतांची हानी होण्याची भीती यापूर्वीच पर्यावरणवादी कार्यकर्त्यानी व्यक्त करून विरोध दर्शवला होता.

Ropeway
Nashik: दुमजली उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालात आता मोठा बदल

त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंग असून देशभरातील भाविकांची येथे वर्षभर वर्दळ असते. तसेच ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी व वैतरणा या दोन प्रमुख नद्यांचा उगम झालेला आहे. गोदावरी नदी दक्षिण भारताची जीवनवाहिनी असून वैतरणा नदीवरील धरणांमुळे मुंबईची पाण्याची गरज भागावली जाते. अंजनेरी व ब्रह्मगिरी  हे पर्वत सह्याद्रीच्या पर्वत रांगेचे भाग असून पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा असून तेथे दरवर्षी भाविक मोठयासंख्येने येत असतात. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी येथे गोदावरीचे उगमस्थानी गंगा दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. यामुळे हे दोन पर्वत रोपवेने जोडण्याचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन विकास मंत्रालयाकडे मांडला.

Ropeway
Nashik DPC : पालकमंत्री भुसेंविरोधात भुजबळांचे शड्डू, कारण...

केंद्र सरकारने प्राथमिक अहवाल व व्यवहार्यता तपासणी केल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोप वे प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. खासदार गोडसे म्हणाले, की रोपवेच्या कामाविषयीचे टेंडर कंपनीने ३१ जुलैपर्यंत मागवले असून आता लवकरच रोप वे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.  अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे दोन्ही पर्वत अतिउंचावर असल्याने मनात असूनही भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. भाविकांना अंजनेरी आणि ब्रह्मगिरीवर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी -ब्रह्मगिरी या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोप वे उभारला जाणार आहे.

Ropeway
Sambhajinagar : पावसाळ्यात खड्ड्यांसाठी तरतूदच नाही; कंबरडे मोडणार

अंजनेरी -ब्रह्मगिरी रोप वे प्रकल्पाचा मुख्य कंट्रोल रूम मध्यवर्ती पेगलवाडी येथे असणार आहे. रोप वेची लांबी ५.७ किलोमीटर असणार असून या प्रकल्पावर होणारा खर्च सुमारे पावणेचारशे कोटी रुपये होणार असल्याचेही खासदार गोडसे यांनी सांगितले. तसेच कार्यादेश दिल्यानंतर २४ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी प्रकल्प प्रस्तावित केला, त्यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या रोपवेला विरोध केला होता. या दोन्ही पर्वतांवर जाणाऱ्या भविकांची संख्या मर्यादित असून त्यासाठी एवढा मोठा खर्च करण्याची गरज नाही. तसेच या रोपवेमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याचेमत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनीमांडले होते. मात्र, त्यानंतरही हा प्रकल्प रेटला जात असल्याचे दिसत आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com