Nashik: दुमजली उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालात आता मोठा बदल

Bolachi Kadhi An Bolachach Bhat
Bolachi Kadhi An Bolachach BhatTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरात द्वारका ते दत्तमंदिर अनेक वर्षांपासून उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यानंतर शहरात निओ मेट्रो (Neo Metro) प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर तोच उड्डाणपूल दुमजली (Double Decker Flyover) करण्याची घोषणा झाली. मात्र, निओ मेट्रो प्रकल्प अद्याप कागदावरच असून, केंद्र सरकारची त्याला मान्यता मिळालेली नाही.

यामुळे तो प्रकल्प व दुमजली उड्डाणपुलाचे भवितव्य दोलायमान असताना आता तो दुमजली उड्डाणपूल द्वारका चौकाऐवजी सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत उभारण्याचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे नुकताच पाठवला आहे. यामुळे घोषणा केलेले प्रकल्प प्रत्यक्षात साकारले जात नसले तरी त्यात बाबत वेगवेगळे बदल करून नाशिककरांचे मनोरंजन केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

Bolachi Kadhi An Bolachach Bhat
शिंदे-फडणवीस वादात आणखी एक ठिणगी; आता शिंदेंनी रोखला...

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये निओ मेट्रो या टायरबेस रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली होती. पुढे केंद्र सरकारने या प्रकल्पाचा अर्थसंकल्पात समावेश केला होता. यामुळे शहरात दोन मार्गिकांसह एकूण बत्तीस किलोमीटर मार्गावर निओमेट्रो प्रस्तावित आहे.

केंद्र शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असून तो झाल्यास पुढील अनेक वर्षे वाहतुकीची समस्या उद्भवणार नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रस्तावासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वीच द्वारका-दत्त मंदिर या दरम्यानच्या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भारतमाला योजनेत वर्गीकरण करून घेतलेले आहे. 

दिवसेंदिवस शहराची झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या पाहता द्वारका- दत्त मंदिर हा दुमजली उड्डाणपूल झाल्यास काही वर्षांनी पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर मात करण्यासाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची मागणी राज्य आणि केंद्र शासनाकडे काही महिन्यांपासून लावून धरण्यात आली आहे.

Bolachi Kadhi An Bolachach Bhat
ठाणे क्लस्टरअंतर्गत 'BMC'सह खासगी भूखंडाबाबत शिंदेंची मोठी घोषणा

नाशिकरोड ते पुणे या हायस्पीड लोहमार्गाचे काम लवकर सुरू होऊन येत्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यातून नाशिकरोड, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वाहतुकीवर मात करण्यासाठी द्वारका - दत्त मंदिरऐवजी सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यंत दुमजली उड्डाणपूल असणे गरजेचे आहे. यानुसार सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे पाठवला आहे. 

नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांची घोषणा जोरात केली जाते. त्या घोषणांना प्रसिद्धीही दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पाचे कामकाज तसूभरही पुढे सरकत नसल्याचा लोकांचा अनुभव आहे.

Bolachi Kadhi An Bolachach Bhat
Nashik DPC : पालकमंत्री भुसेंविरोधात भुजबळांचे शड्डू, कारण...

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचे भवितव्य अंधारात सापडले असून या प्रकल्पासाठी भूसंपादन काही प्रमाणात सुरू असताना केंद्रिय रेल्वे मंत्रालयाने त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल नव्याने तयार करण्याचे सुतोवाच केले आहेत. यामुळे भूसंपादन सध्या रखडले आहे. त्यातच नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा निओ मेट्रो प्रकल्प अजून केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

याचवेळी महारेलने राज्य सरकारला निओ मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपुलाचा सुधारित प्रकल्प अहवाल पाठवला आहे. यामुळे घोषणा केलेले प्रकल्प प्रत्यक्षात येण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी पातळीवर सामसूम असली तरी या कागदांवरच्या प्रकल्पाबाबत नवनव्या बदलांच्या घोषणा जोरदार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com