Sambhajinagar : पावसाळ्यात खड्ड्यांसाठी तरतूदच नाही; कंबरडे मोडणार

sambhajinagar
sambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेकडून शंभरकोटीच्या रस्त्यांचे टेंडर काढण्यात आले, ठेकेदारही मिळाले, मात्र अद्याप एकाही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांची कामे देखील कासवगतीने सुरू आहेत. मागील दहा वर्षात ३६५ कोटी रूपये खर्च करून सिमेंटचे रस्ते तयार केलेत. मात्र त्यांची देखभाल-दुरूस्ती केलीच नसल्याने रस्ते जीवघेणे ठरत आहेत. त्यात पावसाळ्यात ड्रेनेज आणि जलवाहिनी दुरूस्त केल्यानंतर देखील खड्डे तसेच उघडे ठेवले जातात. भरीस भर खाजगी आणि सरकारी दुरसंचार कंपन्यांची शहरात मोठी भर पडली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील महापालिकेने खड्ड्यांसाठीची तरतूद केली नाही. परिणामी पावसाळ्यात जीवघेण्या खड्ड्यांमुळे छत्रपती संभाजीनगरकरांचे कंबरडे मोडणार हे मात्र निश्चित आहे.

sambhajinagar
Mumbai Metro : मेट्रोच्या मास्टर प्लॅनिंगमागील वाघ!

पावसाळा आणि रस्त्यांवरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. त्यातच शहरात सातत्याने होणारी खोदाई आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिमेंट रस्त्यांचे लांबत चाललेले काम यामुळे रस्त्यांवर खड्डे आणि चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी शहरातील बहुतांश डांबरी रस्त्यांना  जागोजागी काँक्रिटचे ‘ठिगळ’ लावलेली आहेत. अशास्त्रीय पद्धतीने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांच्यामागे पाठीचे दुखणे मागे लागत आहे. तसेच सिमेंट रस्ते करताना शास्त्रीय पद्धतीने उतार न देण्यात आल्याने तसेच स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेला खो दिल्याने जागोजागी पाण्याची तळी साचत आहेत. गेल्या दहा वर्षांत शहरात सिमेंट रस्त्यांसाठी ३६५  कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांचे बांधकाम झाल्यावर देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा केल्याने खड्डे कायम आहेत. याऊलट जलवाहिनी आणि ड्रेनेज दुरूस्तीनंतर खड्डे कायम आहेत.

sambhajinagar
Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च करूनही 'तो' येतो अन् 'ती' जाते

महापालिकेचा पथ विभाग आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांकडून कधीच खड्डे दुरुस्ती केली जात नाही. एखादा मोठा अपघात आणि मध्येच न्यायालयात खड्ड्यांच्या याचिकबाबत सुनावणी दरम्यान अहवाल सादर करताना फोटोपुरते चारदोन खड्डे बूजवले जातात. शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरल्यानंतर डांबरी रस्त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.मात्र पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांवर पाणी साचण्याचे  प्रमाण अधीक आहे. असते. सिमेंट रस्त्यांना शास्त्रीय पद्धतीने उतार न दिल्याने पाणी साचून रस्त्याचा पृष्ठभाग सोलून त्यातील काँक्रिट उखडून बाहेर येते. त्यामुळे खड्डे पडतात. रस्त्यांची कामे करताना आधीचा रस्ता पूर्णपणे उकरुन त्याजागी नव्याने काँक्रिट टाकून रस्ते करणे आवश्यक असते. मात्र, महापालिकेने ठेकेदार आधीच्या रस्त्यावरच रस्ता चढवतात. त्यामुळेही खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या कामांवर लक्ष ठेवण्याची आणि दर्जा राखण्याची जबाबदारी असलेले अभियंते ‘टक्केवारी’चे गणित जुळविताना याकडे दुर्लक्ष करतात.

sambhajinagar
Nashik: दुमजली उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालात आता मोठा बदल

महापालिका शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते खोदून तेथील मलनि:स्सारण आणि जलवाहिन्या बदलण्याचे काम करते. मात्र, हे काम झाल्यावर रस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ववत करण्यात येत  नाहीत. सद्य:स्थितीत शहरातील रस्त्याची सध्याची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्यांवर पाणी साचून राहात असल्याने पाण्याखालील खड्डेही दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहेत. सालाबादप्रमाणे खड्डे चुकविताना  अपघात होतात. वाहनचालकांना प्राणास मुकावे लागते. याचे महापालिकेला कुठलेही सोयरसुतक नसल्याचे खड्डेमय स्थितीवरून दिसते. पावसाळ्यात शहरातील प्रत्येक रस्त्यांची पाहणी करून खड्ड्यासाठीची तरतूद महापालिकेने करणे अपेक्षित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com