सांगलीत एकाच रस्त्यावर 2 वेगवेगळ्या योजनांतून तब्बल 10 कोटी हडपले

PWD SCAM
PWD SCAMTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात खरसुंडी-बलवडी (खु)-पारे-आळते या २६ किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारणा कामाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि ठेकेदार मेगा अॅटोबन प्रा. लि. कराड यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या योजनांतून तब्बल १० कोटींहून अधिक रुपये हडप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू करून संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

PWD SCAM
सरकारचा मोठा निर्णय; कोणाला मिळणार 5 ब्रास मोफत वाळू?

एक रस्ता, दोन योजना, कोट्यवधींची लूट

पहिल्या योजनेत, केंद्र सरकारच्या रस्ते निधीतून (Scheme Code 30540167 - 800 (I) A - Central Road Fund) ४ कोटी २ लाख ४५ हजार रुपयांचे काम मंजूर करून १७ जानेवारी २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आला. मेगा अॅटोबन प्रा. लि. या ठेकेदाराला ३० मार्च २०२२ ते २ जानेवारी २०२४ या कालावधीत ७ टप्प्यांत ५ कोटी १९ लाख रुपये देण्यात आले.

दुसऱ्या योजनेत, राज्याच्या बजेटमधून (Scheme Code 50540106 - Major Works, District and Other Roads) त्याच रस्त्यासाठी ३ कोटी ९९ लाख ७० हजारांचे काम मंजूर करून ३१ मे २०२२ रोजी कार्यादेश जारी झाला. यातही त्याच ठेकेदाराला ९ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ७ टप्प्यांत ४ कोटी ७९ लाख रुपये दिले गेले. म्हणजेच, एकाच रस्त्यावर दोनदा कोट्यवधी रुपये लुटण्याचा हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचा नंगानाच आहे.

हा घोटाळा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मिलीभगताशिवाय शक्यच नाही. एकाच रस्त्याच्या कामाला दोनदा निधी मंजूर करणे, ठेकेदाराला मूळ कंत्राटापेक्षा जास्त रक्कम देणे आणि हे सगळे करताना कोणतीही चौकशी न होणे, हे स्पष्ट दर्शवते की अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला संरक्षण देऊन स्वतःचा खिशाही गरम केला आहे. दोन्हीवेळी मंजूर रकमेपेक्षा तब्बल १ कोटी ९६ लाख रुपये जास्त देण्यात आले, तरीही या रस्त्याची गुणवत्ता आणि कामाचा दर्जा संशयास्पद आहे, असा आरोप माने यांनी केला.

PWD SCAM
Solapur : दोन उड्डाणपूल दहा वर्षांपासून कागदावरच; दहा वर्षांत प्रकल्पाच्या किमतीत अडीचपटीने वाढ

हा घोटाळा म्हणजे जनतेच्या कररुपी पैशावर थेट दरोडा आहे. या प्रकरणात मेगा अॅटोबन प्रा. लि. आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. हा घोटाळा उघड झाल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असे ते म्हणाले.

असा झाला घोटाळा

१) कामाचे स्वरूप

खरसुंडी बलवडी (खु) पारे आळते रस्ता प्रजिमा २६ किमी ४/०० ते १३/०० रस्त्याचे रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण (सुधारणा) करणे, ता खानापूर जि सांगली

सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारच्या रस्ते निधीतून ( scheme code 30540167 - 800 (I) A - Central Road Fund) हे काम मंजूर केले.

४ कोटी २ लाख ४५ हजार रुपये खर्चाच्या या कामासाठी १७ जानेवारी २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आला.

मेगा अॅटोबन प्रा लि कराड या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. Mega autobahn pvt Ltd

३०/३/२०२२ ते २/१/२०२४ या कालावधीत ७ टप्प्यात ठेकेदाराला ५ कोटी १९ लाख रुपये भागविण्यात आले.

PWD SCAM
Ambulance Tender Scam : मोठी बातमी! अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळ्यातील ठेकेदारांपुढे सरकार झुकणार का?

२) कामाचे स्वरूप

खरसुंडी बलवडी (खु) पारे आळते रस्ता प्रजिमा २६ किमी ४/०० ते १५/०० रस्त्याचे रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण (सुधारणा) करणे, ता खानापूर जि सांगली

सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या बजेटमधून ( scheme code 50540106 - Major works, district and other roads) हे काम मंजूर केले.

३ कोटी ९९ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या या कामासाठी ३१ मे २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आला.

मेगा अॅटोबन प्रा लि कराड या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. Mega autobahn pvt Ltd

९/९/२०२२ ते ८/९/२०२३ या कालावधीत ७ टप्प्यात ठेकेदाराला ४ कोटी ७९ लाख रुपये भागविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com