एसटीची 5 हजार बसेसची टेंडर्स का रखडली? 1600 कोटींचा निधी परत जाणार का?

MSRTC, Pratap Sarnaik
MSRTC, Pratap SarnaikTendernama
Published on

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नवीन बस दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकून पडली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल १६०० कोटी रुपये अद्याप खर्चाविना पडून असून, आर्थिक वर्ष संपायला केवळ तीन महिने उरले आहेत.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, कामे वेळेत पूर्ण न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

MSRTC, Pratap Sarnaik
Jal Jeevan Mission: राज्यात पाणीपुरवठा योजनांची 25 हजार कामे ठप्प; कारण काय?

राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या बळकटीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या आर्थिक वर्षात ८ हजार नवीन पर्यावरणपूरक बस ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सद्यस्थितीत ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केवळ २,६४० बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ३ हजार बसेससाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन दोन खासगी कंपन्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. उर्वरित ५ हजार बसेसची टेंडर प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे.

नवीन बस खरेदीसाठी प्रशासनाकडे १२०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप टेंडर आणि कार्यादेश काढण्यास दिरंगाई केली जात आहे. या विलंबासाठी महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात असल्याचे समजते. मात्र, अर्थसंकल्पीय तरतूद असतानाही कामे रखडल्याने मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

MSRTC, Pratap Sarnaik
Good News! तब्बल तेराशे कोटी; 4 वर्षे अन् मुंबईकरांची कटकट संपणार

चालू आर्थिक वर्षात एसटी महामंडळासाठी एकूण २,४६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या बस बदलून पर्यावरणपूरक नवीन बस खरेदी करणे, पायाभूत सुविधाअंतर्गत बसस्थानकांची उभारणी, दुरुस्ती आणि विस्तार करणे, स्थानकांवर प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, तसेच प्रत्येक स्थानक आणि आगाराच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे या कामांसाठी वापरला जाणार होता.

मात्र, यातील अनेक कामे टेंडरअभावी प्रलंबित आहेत. जर येत्या तीन महिन्यांत हा निधी खर्च झाला नाही, तर तो राज्य सरकारकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

MSRTC, Pratap Sarnaik
Good News! वर्षाअखेरीस ऐरोली ते कटाईनाका अवघ्या 15 मिनिटांत

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख आणि इतर खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांच्या हिताच्या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रखडलेल्या टेंडर तातडीने मार्गी लावून ताफ्यात नवीन बस दाखल करण्याची प्रक्रिया गतिमान करा.

MSRTC, Pratap Sarnaik
Mumbai Metro-12: ऑरेंज लाईनचे काम मिशन मोडवर

एसटी महामंडळांतर्गत नवीन बस स्थानके, प्रसाधनगृहे आणि नवीन बस घेण्याबाबतची प्रक्रिया टेंडरअभावी प्रलंबित आहे. तीन महिन्यांमध्ये ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल.

- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com