ठाणे-घोडबंदर-भाईंदर एलिव्हेटेड रोड प्रकल्प आता 'सुसाट'; 6 हजार कोटींच्या टेंडरला L&T ने का घेतला होता आक्षेप?

Thane Ghodbandar To Bhayandar Eleveted Road Tunnel : MMRDA कडून ठाण्याच्या घोडबंदर रोडपासून ते भाईंदरपर्यंत एलिव्हेटेड रोड बांधण्यात येणार आहे
elevated corridor
elevated corridorTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे - घोडबंदर - भाईंदरपर्यंतच्या बोगदा आणि एलिव्हेटेड रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे होती. त्यामुळे एमएमआरडीएचा हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या प्रकरणी एलॲण्डटी (L&T) कंपनीने आक्षेप घेत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

elevated corridor
Nashik : नाशिक जिल्ह्यात 'जलजीवन मिशन' अपयशी ठरतेय का? काय म्हणाले पालकमंत्री महाजन?

या प्रकल्पाच्या सुमारे ६ हजार कोटींच्या टेंडरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे. तसेच या प्रकल्पाचे टेंडर तूर्तास उघडू नये, असे आदेश दिले होते.

या प्रकरणी आज न्यायालयाने टेंडरचा मार्ग मोकळा करत एलॲण्डटी कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. तसेच आर्थिक टेंडर उघडण्यासाठीची स्थगितीही न्यायालयाने उठवली. त्यामुळे एमएमआरडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

elevated corridor
Pune : हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या 'त्या' रस्त्याचे काम का रखडले?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाण्याच्या घोडबंदर रोडपासून ते भाईंदरपर्यंत एलिव्हेटेड रोड बांधण्यात येणार आहे. वसई खाडीवर 9.8 किमी लांबीचा एलिव्हेटेड पूल बांधण्यात येणार असून, बोगदाही बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.

आपल्याला टेंडरच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सहभागी इतर कंपन्यांना ती माहिती देण्यात आल्याचा दावा करत एलॲण्डटी कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

elevated corridor
Mumbai : 'त्या' प्रकल्पावर कट-कमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या! मंत्री आशिष शेलारांच्या टार्गेटवर कोण?

एलॲण्डटी कंपनीने 30 डिसेंबर 2024 रोजी दोन्ही टेंडर सादर केली. एमएमआरडीएने 1 जानेवारी रोजी तांत्रिक टेंडर उघडले, परंतु, कंपनीला निकालाबाबत कळवण्यात आले नाही, असा युक्तिवाद एलअ‍ॅण्डटीच्या वतीने करण्यात आला तर पात्र बोलीदारांनाच टेंडर प्रक्रियेतील त्यांच्या स्थितीची माहिती दिली जाते इतर सहभागी कंपन्यांना माहिती दिली जात नाही, असा युक्तिवाद एमएमआरडीएच्यावतीने करण्यात आला.

न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत एलअ‍ॅण्डटीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज न्यायालयाने निकाल देत याचिका फेटाळून लावली तसेच कंपनीने घेतलेले आक्षेपही मान्य करण्यास नकार दिला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com