Exclusive: 'त्या' वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची स्कॉटलंडवारी वादाच्या भोवऱ्यात; बलाढ्य 'इन्फ्रा' कंपनीची मेहेरबानी?

मुंबई पायाभूत प्रकल्पांशी संबंधित अधिकाऱ्याच्या परदेश दौऱ्याबाबत चर्चा; इन्फ्रा कंपनीच्या पाहुणचाराबाबत आरोप
scam, mumbai
scam, mumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, ज्यांच्या एका सहीने हजारो कोटींच्या टेंडर सुटतात, ते एक वरिष्ठ सनदी अधिकारी सध्या विकासकामांच्या फाईल्समुळे नाही, तर त्यांच्या 'रॉयल' छंदांमुळे चर्चेत आले आहेत. मुंबईच्या पायाभूत सुविधांचे भाग्यविधाते समजले जाणारे हे वरिष्ठ स्कॉटलंडच्या हिरवळीवर गोल्फचे फटके मारून परतताच चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

scam, mumbai
नाशिकमध्ये ABBची 184 कोटींची गुंतवणूक; सातपूर MIDCमध्ये...

गोल्फचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या स्कॉटलंडमधील सेंट अँड्र्यूज लिंक्स येथे नुकतीच एक आंतरराष्ट्रीय दर्जाची गोल्फ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहकुटुंब हजेरी लावणारे महाराष्ट्रातील हे एकमेव वरिष्ठ सनदी अधिकारी ठरले आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर अशा शहरांमधील गोल्फ कोर्स गाजवल्यानंतर संबंधित वरिष्ठांनी थेट सातासमुद्रापार झेप घेतली. छंद जोपासणे ही वैयक्तिक बाब असली, तरी या छंदासाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यामागील अर्थकारण मात्र संशयाच्या भोवऱ्यात आहे.

scam, mumbai
Nashik MHADA Land Scam: चौकशी समितीची दिशाच भरकटली

संबंधित वरिष्ठांच्या या परदेश दौऱ्याचा, विमानाचा प्रवास आणि पंचतारांकित वास्तव्याचा संपूर्ण खर्च एका बलाढ्य इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उचलल्याचे बोलले जाते. योगायोग असा की, याच कंपनीला वरिष्ठ कार्यरत असलेल्या आस्थापनेमार्फत एका मोठ्या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे, ज्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ज्या प्रकल्पासाठी या कंपनीची निवड झाली, त्याची किंमत अंदाजित खर्चापेक्षा तब्बल ३ हजार कोटी रुपये अधिक होती. न्यायालयाने ताशेरे ओढूनही हे काम त्याच कंपनीला मिळाले. आता त्याच अवाढव्य नफ्यातील काही भाग गोल्फच्या छंदावर खर्च होत असल्याची चर्चा मंत्रालय परिसरात रंगली आहे.

scam, mumbai
Exclusive: स्वच्छतेचा 'चकाचक' देखावा अन् 500 कोटींचा कचरा! भिंती रंगल्या, खिसे भरले; पण कचरा कोंडी कायम

भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, एका बाजूला कंत्राटदार कंपनीकडून पाहुणचार झोडायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच आस्थापनेकडून अधिकृत दौरा दाखवून कोट्यवधी रुपये उकळायचे, असा हा दुहेरी प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विश्वसनीय माहितीनुसार, संबंधित वरिष्ठांच्या या परदेश दौऱ्याचा खर्च सरकारी तिजोरीतून तब्बल ३ कोटी रुपयांच्या घरात दाखवण्यात आला आहे. जनतेचा घाम गाळून भरलेला कर, मुंबईच्या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पैसा, हे वरिष्ठ स्कॉटलंडच्या मैदानावर गोल्फ खेळण्यासाठी स्वतःच्या खिशात घालत असल्याचे चित्र आहे.

scam, mumbai
Exclusive: सॅटेलाईटची नजर उघड करणार 'बायोमायनिंग'चा काळा बाजार; 70च्या दशकापासूनचा हिशोब होणार पूर्ण!

स्कॉटलंडची वारी आटोपून संबंधित वरिष्ठ आता नवी मुंबईतील खारघर गोल्फ कोर्स येथे आयोजित स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ज्या शहरात सामान्य माणसाला साध्या घरासाठी वणवण करावी लागते, तिथे हे वरिष्ठ अतिश्रीमंतांचा खेळ खेळत कोट्यवधींची उधळपट्टी करत आहेत.

मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा 'रॉयल' भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आल्यामुळे खळबळ उडाली आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com