नाशिकमध्ये ABBची 184 कोटींची गुंतवणूक; सातपूर MIDCमध्ये...

सर्किट ब्रेकर्स आणि व्हॅक्यूम इंटरप्टर उत्पादनासाठी प्लॅंटचा विस्तार; ‘मेक इन इंडिया’ला चालना
Nashik, Startup
Nashik, StartupTendernama
Published on

नाशिक (Nashik): जागतिक स्तरावरील विद्युत आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ABB India ने भारतात सुमारे 692 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून त्यातील 184 कोटींची सर्वाधिक गुंतवणूक नाशिकमध्ये केली जाणार आहे. सातपूर एमआयडीसीमधील उत्पादन केंद्राचा विस्तार करण्यात येणार असून, या प्रकल्पातून 300 हून अधिक अभियंते आणि कुशल कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Nashik, Startup
Kumbh Mela 2027 Nashik: सिंहस्थासाठी नाशिकमध्ये 3 हजार कोटींच्या 16 प्रकल्पांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

जागतिक स्तरावरील मुख्यतः विद्युत उत्पादने, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि मोशन तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी एबीबी इंडियाने भारतात ६९२ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी प्रामुख्याने सर्किट ब्रेकर्स, पॉवर कन्व्हर्टर्स, इन्व्हर्टर्स, मोटर्स, जनरेटर्स, प्रेशर मापन यंत्रे, एक्ट्युएटर्स आणि इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम्स आदींचे उत्पादन करते.

'एबीबी इंडिया'ने भारतातील बेंगळुरू, हैदराबाद, वडोदरा व नाशिकमध्ये ही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्याते सर्वाधिक १८४ कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक येथे केली जाणार आहे. यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. एबीबीच्या नाशिक प्लॅंटमधील  गुंतवणुकीतून इंजिनियर्स, संशोधक व इतर कुशल कामगार असा ३०० हून अधिक जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.

Nashik, Startup
पुणे रिंग रोडच्या धर्तीवर देवळाली रिंग रोड भूसंपादनासाठी विशेष पॅकेज

एबीबी इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणेनुसार नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमधील सध्याच्या उत्पादन केंद्राचा या गुंतवणुकीतून विस्तार केला जाणार आहे. नाशिक येथेप्रामुख्याने इनडोअर' आणि 'आउटडोअर सर्किट ब्रेकर्स'च्या उत्पादनावर भर देण्यात येईल. याव्यतिरिक्त व्हॅक्यूम इंटरप्टर (व्हीआय) कारखान्याची क्षमतादेखील वाढविण्यात येणार आहे. या विस्तारामुळे नाशिकमधील उत्पादने केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेसाठी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिकच्या या प्रकल्पामध्ये 'मेक इन इंडिया'अंतर्गत ३३ केव्ही प्रायमरी गॅस इन्सुलेटेड स्विचगिअरचे स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचा विचार करून २०२८ पर्यंत 'एसएफ ६-मुक्त' तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासात नाशिकचा हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावेल.

गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये इंजिनिअरिंग, ऑपरेशन्स आणि संशोधन क्षेत्रात ३०० हुन अधिक कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. नाशिकमधील गुंतवणुकीमुळे स्थानिक स्तरावर तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Nashik, Startup
Nashik MHADA Land Scam: 159 कोटींच्या घोटाळ्यात कोण कोणाला वाचवतोय?

या कारणांसाठी गुंतवणूक
ही गुंतवणूक मुख्यतः विद्युत आणि ऑटोमेशन उत्पादनांसाठी आहे. हैदराबाद येथील ११० कोटींच्या गुंतवणुकीतून संशोधन, अभियांत्रिकी प्रयोगशाळा आणि कार्यालये यांची उभारणी केली जाणार आहे.

नाशिकमधील १८४ कोटींच्या गुंतवणुकीतून सर्किट ब्रेकर्स आणि व्हॅक्यूम इंटरप्टर्सच्या उत्पादनासाठी विस्तार, तसेच हाय-व्होल्टेज तंत्रज्ञानाचे स्थानिकीकरण केले जाणार आहे.

बेंगळुरूमधील ३१५ कोटींची गुतवणूक ही नेलमंगला व पीन्या या दोन ठिकाणच्या कारखान्यांमध्ये विभागून केली जाणार आहे. तेथे पॉवर प्रोटेक्शन सिस्टम्स, कन्व्हर्टर उत्पादन, स्पेशलाइज्ड मोटर्स (सस्टेनेबल मोबिलिटी आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनसाठी) यांच्या क्षमतांचा विस्तार केला जाणार आहे.

वडोदरा येथे ५५ कोटींच्या गुंतवणुकीतून स्लो-स्पीड सिंक्रोनस जनरेटर्स आणि इंडक्शन मोटर्सच्या उत्पादनाचा विस्तार केला जाणार आहे. ही गुंतवणूक भारत सरकारच्या मेक इन इंडिया या धोरणानुसार केल्याचेही कंपनीकडून जाहीर केले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com