Nadhavade MIDC: सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला वेग; 15 कोटींच्या कामांची तयारी

११.१४ हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात; कालबाह्य अंदाजपत्रकाचा फेरआढावा घेऊन सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
uday samant
uday samanttendernama
Published on

मुंबई (Mumbai): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला गती देण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. सुमारे ११.१४ हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली असून, १५ कोटी रुपयांच्या प्रस्तावित पायाभूत कामांसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. या औद्योगिक क्षेत्रात प्रारंभी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

uday samant
Dadasaheb Phalke Film City: मुंबई फिल्म सिटीचा होणार कायापालट; चित्रपट, टीव्ही, ओटीटी उद्योगासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात प्रस्तावित नाधवडे एमआयडीसीच्या पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यात येणार आहे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी तातडीने सादर करावे, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत नाधवडे औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

uday samant
Urban Challenge Fund: महाराष्ट्रातील 423 शहरांसाठी मोठा निर्णय; 44,800 कोटींचे प्रकल्प आकाराला येणार

११.१४ हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात

नाधवडे येथील सुमारे ११.१४ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरण करण्यात आले असून, सातबारा नोंदीही एमआयडीसीच्या नावावर झाल्या आहेत.

या औद्योगिक क्षेत्रासाठी २०२२-२३ मध्ये पायाभूत सुविधांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, ते कालबाह्य झाल्यामुळे प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून सध्याच्या आवश्यकतांनुसार वास्तववादी आणि सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून सुमारे १५ कोटी रुपयांची कामे विलंब न करता सुरू करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

uday samant
Nashik Infra: सिंहस्थाच्या निमित्ताने 'या' 5 रेल्वेस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा

वीज उपकेंद्रासाठी ४० गुंठे जमीन

नाधवडे येथे प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली ४० गुंठे जमीन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित उद्योगांना आवश्यक वीजपुरवठा सुविधा उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

औद्योगिक क्षेत्र विकसित करताना परिसरातील पाण्याच्या उगमस्थानांचे संरक्षण करण्यासह पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पर्यावरणीय बाबींची काळजी घेऊनच औद्योगिक विकास केला जाईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

uday samant
Bhandup Eco Nature Park: मुंबईत देशातील पहिले AI आधारित पक्षी निरीक्षण केंद्र; भांडूप प्रकल्पासाठी 45 कोटींचा निधी

एमएसएमई उद्योगांना प्राधान्य

नाधवडे औद्योगिक क्षेत्रात प्रारंभी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी भूखंड विकसित करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिक उद्योग सुरू होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाणार आहे.

नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत आहे. प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग आणि विद्यमान रेल्वेस्थानकाच्या जवळ असल्यामुळे या परिसराला रस्ते व रेल्वे जोडणीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नाधवडे हे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

uday samant
Mumbai Bandra Connector: मुंबईत वांद्रे सागरी सेतू ते वांद्रे किल्ला कनेक्टर; 45 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांवर येणार

Key Points Summary

  • नाधवडे एमआयडीसीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांची पायाभूत कामे प्रस्तावित.

  • सुमारे ११.१४ हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात.

  • संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदल्याचे वितरण पूर्ण.

  • सातबारा नोंदी एमआयडीसीच्या नावावर झाल्या.

  • २०२२-२३ मधील कालबाह्य अंदाजपत्रकाचा फेरआढावा घेणार.

  • प्रत्यक्ष स्थळपाहणीनंतर सुधारित आणि वास्तववादी अंदाजपत्रक तयार करणार.

  • प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी ४० गुंठे जमीन उपलब्ध होणार.

  • प्रारंभी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी प्लॉटिंगला प्राधान्य.

  • अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास मोठ्या उद्योगांसाठीही जागेचा विचार.

  • पाण्याच्या उगमस्थानांचे संरक्षण आणि पर्यावरणीय दक्षतेवर भर.

  • राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे जोडणीचा औद्योगिक क्षेत्राला लाभ मिळणार.

Tendernama
www.tendernama.com