Mumbai : कामचुकार कंत्राटदारांना दणका! काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

Ashish Shelar
Ashish ShelarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कंत्राटदारांनी ज्या पध्दतीने रस्त्यांच्या कामाचे नियोजन केले पाहिजे होते, ते केलेले दिसत नाही. जे कंत्राटदार काम करत नाहीत त्यांच्यावर मजबूत दंड लावण्यात यावा, असे निर्देश आम्ही दिलेत, असे मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले आहे.

Ashish Shelar
आता जिरायती 20 गुंठे, बागायती 10 गुंठ्यांच्या आतील खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंद अशक्य; कारण...

मंत्री आशिष शेलार यांनी पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा पाहणी दौरा केला. मुंबई पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, गेली ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर सोबत होते, ही सर्व परिस्थीती आणि नागरिकांचा रोष त्यांच्या लक्षात आणून दिला आणि तातडीने या सर्व बाबतीत सुधारणा करा, अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.

Ashish Shelar
ठाणे-घोडबंदर-भाईंदर एलिव्हेटेड रोड प्रकल्प आता 'सुसाट'; 6 हजार कोटींच्या टेंडरला L&T ने का घेतला होता आक्षेप?

मुंबई पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर पश्चिम ते विक्रोळी पार्क साईट रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, येथील रस्त्यावर काही तासांपूर्वीच सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक त्रासले असून त्यांनी कंत्राटदारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

एस वॉर्डमधील भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रिटीकरण झाले आहे आणि रस्त्याची लेव्हल देखील योग्य केलेली नाही, अशी गंभीर स्थिती निदर्शनास आली.

Ashish Shelar
Mumbai : जोगेश्वरीतील ‘त्या’ 17 इमारतींच्या पुर्नविकासाला मुहूर्त कधी?; टेंडर प्रक्रिया पूर्ण करूनही म्हाडाचे हातावर हात

स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून देत याबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

या दौऱ्यात आमदार पराग शाह, आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक नील सोमैया, प्रकाश गंगाधरे, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत आमची जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्ली फिरू, आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करुन घेऊ, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com