Mumbai: सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडणार; 550 कोटींचे टेंडर प्रसिद्ध

BMC Mumbai
BMC MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.

BMC Mumbai
Good News! नवी मुंबईत स्वस्तात खरेदी करता येणार सिडकोचे घर

प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून या ठिकाणी कोणतंही कॉक्रिटचं काम होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

सुरळीत वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने सेंट्रल पार्क १२०० मीटर भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी सध्या ५५० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. तसेच सेंट्रल पार्कची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

BMC Mumbai
Navi Mumbai: मेट्रो-8 मुळे होणार दळणवळण क्रांती; नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवा आयाम

महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकरवर जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी होतेय. कोस्टल रोडची १७० एकर जागा असे एकूण २९५ एकरचे भवदिव्य सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. तसेच सेंट्रल पार्कखाली १० लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही विकसित केले जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांसह खेळ, खो-खो, कबड्डी, अशा मराठमोळ्या खेळांसाठीही सुविधा उपलब्ध होईल. हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यावरण पूरक आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सेंट्रल पार्कमध्ये फिरताना मुंबईकरांना अश्वशर्यतीही पाहता येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सेंट्रल पार्कच्या भूपृष्ठावर पदपथ वगळता कोणतेही बांधकाम नाही. हे संपूर्ण उद्यान असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. येथे सुरळीत वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हे सेंट्रल पार्क १२०० मीटर भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी ५५० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले आहे.

BMC Mumbai
Mumbai Agra National Highway: चांदवड धुळे महामार्गाचे होणार सहा पदरीकरण

सेंट्रल पार्कच्या कनेक्टिव्हीटीबाबत बोलताना आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की या पार्कसाठी मेट्रो ३ मार्गावर नेहरु विज्ञान केंद्र हे जवळचे स्टेशन आहेत. या स्टेशनला भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्कशी जोडले जाईल, हा भूमिगत मार्ग अँनी बेझंट मार्गाने पुढे हाजीआलीपर्यंत जाऊन पार्किंगला जोडला जाईल, तिथून तो कोस्टल रोडशी जोडला जाईल, असे आयुक्त गगराणी म्हणाले. कोस्टल रोड आणि सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने जोडल्याने सेंट्रल पार्क आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये येणाऱ्या गर्दीचे नियोजन करता येईल. कोस्टल रोड पार्किंगमध्ये १२०० गाड्या, १०० बसेस पार्क करण्याची क्षमता आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या प्रकल्पामुळे ३०० एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्यानं मुंबईतील हवेचं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मे महिन्यापर्यंत मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण पूर्ण होईल. ६ डिसेंबर २०२६ पर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होतील. महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

BMC Mumbai
Nashik: नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; 'हा' भाग वगळला

महत्त्वाचे मुद्दे

- आजवर फक्त श्रीमंतांसाठी असलेले महालक्ष्मी रेसकोर्स आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुलं होणार आहे.

- हे ३०० एकरावरील अंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क मुंबईसाठी ऑक्सीजन पार्क ठरेल.

- या सेंट्रल पार्कचा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे. हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी अत्यंत सुरेख असा आराखडा तयार केला आहे.

- सेंट्रल पार्कची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.

- रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

- १२० एकरवर तीन इंटर कनेक्टेड झोन्स तयार केले जाणार असून प्रत्येक झोन्स भूमिगत मार्गांनी जोडले जाणार आहेत. यामुळे विनाअडथळा वाहतूक सुरू राहील.

BMC Mumbai
Nashik: पेठ बसस्थानकाचे बांधकाम पाडण्याचे आदेश; काय आहे कारण?

मुंबईतील सेंट्रल पार्कची वैशिष्ट्ये

१) १२ एकर जागेवर सिटी फॉरेस्ट विकसित केले जाईल. यामुळे मुंबईला भरपूर ऑक्सीजन देत प्रदूषण कमी करण्यास मदत करेल.

२) ७७ एकरवर गार्डन आणि ओपन कॉन्सर्टसाठी मैदान राखीव असेल.

३) ३१ एकरवर बॉटनिकल गार्डन, इनडोअर कॉन्सर्ट अरेना आणि कॉन्व्हेंशन सेंटर असेल.

४) हिरवेगार बॉटनिकल लॅंडस्केप आणि वर्ल्ड क्लास इंडोअर अरेना असेल.

४. मल्टी स्पोर्ट अरेना (Multi-Sport Arena)

सेंट्रल गार्डन खाली वर्ल्ड क्लास मल्टी स्पोर्ट अरेना त्यात अक्वाटिक अरेना, आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग, खो-खो, स्केटींग, जिमॅस्टिक, बास्केटबॉल असे अनेक क्रीडा प्रकारांसाठी मैदाने आणि प्रशिक्षणाची सुविधा असेल. मुंबईच्या तरुण खेळाडूंसाठी आणि क्रीडा प्रेमींसाठी एक अद्ययावत क्रीडा परिसंस्था त्यामुळे तयार होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com