Sambhajinagar : आधीच उंच दुभाजक त्यात अनेक ठिकाणी तडे; दुभाजकाला...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : कॅम्ब्रीज नाका ते झाल्टा फाटा ते पैठण जंक्शन, झाल्टा फाटा ते निपानी फाटा येथील दुभाजकावर वारंवार वाहने धडकत असून, नव्यानेच बांधलेले दुभाजक पुन्हा ढासळण्याच्या स्थितीत आहे. महिनाभराच्या अंतरात चार ते पाच वेळा वाहनांनी या दुभाजकाला धडक दिल्याने सद्यःस्थितीत या दुभाजकाला मोठे तडे गेले आहेत. विशेष म्हणजे बांधकाम झाल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या दुभाजकांना आधीच तडे गेलेले आहेत.‌ बीड बायपास या तीस मीटर रस्त्याचेच सहा पदरीकरण केले आहे. मार्गात कुठेही मोठे वळण नसल्याने जड वाहनांची पंचायत झालेली आहे. उड्डाणपुलांखालून वाहने वळण घेत असताना मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : जलवाहिनीत फसले रस्ते, मुख्य मार्गांची लागली ‘वाट’

या राष्ट्रीय महामार्गावर पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा दरम्यान एमआयटी, संग्रामनगर आणि देवळाई चौकातील उड्डाणपुलांखालून जड वाहनांना वळण घेण्यासाठी यावे लागते. जड वाहने वळसा घेऊन जाण्याचा मार्ग आहे. दरम्यान जड वाहने वळवतांना चालकांची दमछाक होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. या वाहनांना वळसा घेताना पुलांच्या सर्व बाजूंनी वाहतुक कोंडी होत आहे. या मार्गावर बांधलेल्या अति उंचीच्या दुभाजकामुळे चारचाकी, दुचाकी वाहने दिसत नाहीत. या दुभाजकात काही वनस्पतींची रोपे लावता येतील अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. येणाऱ्या वाहनचालकांना या दुभाजकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच देवळाई चौकालगत या दुभाजकाला एका ट्रकचे टायर फुटल्याने जोरदार धडक दिली होती. त्या धडकेत या दुभाजकाचे सर्वच बांधकाम उखडून गेले आहे. दुभाजकातील काॅक्रीट मधील स्टील उखडून गेले आहे. या अपघातानंतर आता या दुभाजकाचे कधी व्यवस्थित बांधकाम करण्यात येईल, असा सवाल प्रवाशांना पडल आहे. दुभाजकाचे बांधकाम झाल्यानंतर त्याला पांढरा आणि काळा रंग देण्यात आला होता.मात्र काही महिन्यांतच दुभाजक बेरंग झाला आहे.गेल्या चार ते पाच महिन्यांत वाहनांनी धडक दिल्याने दुभाजक अनेक ठिकाणी तुटले आहे. जेथे वळणाचा भाग आहे, तेथे भरधाव वळण घेताना दुभाजकाला धडक बसते, असे येथील नागरिकांनी सांगितले. वाहनांनी सावकाशपणे वळण घेतल्यास असे अपघात घडणार नाहीत, असेही नागरिक म्हणाले.

Sambhajinagar
Mumbai : गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल समस्या; 3 महिन्यात तोडगा निघणार

रात्रीच्या सुमारास घटना

पैठण जंक्शन कडून झाल्टा फाटा या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. यासाठी आडगाव ते करोडी पर्यायी मार्ग तयार केलेला असताना जड वाहने घुसखोरी करतात.‌ जाणाऱ्या जड अवजड वाहनांकडून रात्रीच्या सुमारास या दुभाजकाला धडक दिली जाते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक भरधाव वाहने चालवत असल्याने हे प्रकार घडतात. दिवसा या ठिकाणी दोन ते तीन वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहने अडविण्यासाठी थांबलेले असतात, त्यामुळे वाहनांचा वेग कमी असतो.

रिफ्लेटर बसविण्याची मागणी

वर्षभरात दुभाजकाला सहा ते सात वेळा अज्ञात वाहन येऊन धडकत असते. या दुभाजाकाचा दुरुस्ती व रंगरंगोटी खर्च हा जनतेच्या पैशातून करावा लागतो. या खर्चाच्या प्रमाणात घट होऊन असे प्रसंग टळावे, यासाठी बांधकाम विभागाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे. या ठिकाणी रिफ्लेटर बसावे व अपघाती वळण आहे, अशा आशयाचा फलक लावावा, अशी मागणी वाहनचालक व रहिवाशांनी केली आहे.

Sambhajinagar
Mumbai News : मुंबईच्या खड्डेमुक्तीसाठी काय आहे बीएमसीचा मास्टर प्लॅन?

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कायम

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम १ जुन २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. ३१ मार्च २०२४ पर्यंत त्याला कामाची मुदत दिली होती. मात्र अद्याप रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एमआयटी, संग्रामनगर येथे जोड रस्त्याची कामे सुरू आहेत. देवळाई चौकातील काम झाले आहे. मात्र देवळाई ते शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ कडे जाताना टेमकाडाने वाहने चढ-उतार करताना चालकांना कंबरतोड सोसावी लागत आहे. हा मार्ग सुस्थितीत करून कधी पूर्णतः वाहतूकीस मोकळा करण्यासाठी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना बुध्दी सुचेल असा सवाल उपस्थित होत आहे.

या कामाचे टेंडर निघाल्यानंतर रस्त्याच्या कामाची सुरवात झाल्याने  सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी मागील तीन वर्षात काम चालू असतानाच अकरा लोकांचा बळी गेला. शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले पण त्यासाठी निधीची उपलब्धतता होत नव्हती. हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. इस्टिमेट तयार केले गेले. त्यातअंतर्गत २९२ कोटी तून होणाऱ्या या रस्त्यावर तीन  उड्डाणपूल अंत्यंत चुकीच्या पध्दतीने बनविण्यात आले." टेंडरनामा " यावर सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर विधानसभेत अनेक आमदारांनी आवाज उठवला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील कामाची पाहणी करून अधिकारी व कंत्राटदाराची कान उघाडणी केली.या पार्श्वभूमीवर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी पुलांखालचे रस्ते खोदून उंची वाढवली. मात्र अद्यापही जड वाहनांना त्रास कायम आहे. टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले आहे.‌ महानुभाव चौक आश्रम ते झाल्टा फाटा आणि झाल्टा फाटा ते केंब्रीज चौक तसेच झाल्टा फाटा ते निपानी फाटा रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या पुलांखाली कायम वाहतूक कोंडी होत आहे. महानुभाव चौक ते झाल्टा फाटा हा १३ किलोमीटर दरम्यान अद्याप काही ठिकाणी जोड रस्ते व मायनर पुलांचे काम बाकी आहे. ज्याठिकाणी काम झाले आहे. तेथे लोखंडी बॅरिकेड्स टाकले नसल्याने उघड्या नाल्या मृत्युला आमंत्रण देत आहेत.‌ ज्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स टाकले आहेत , तेही वाहनांच्या धडकांनी तुटत आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com