Mumbai : गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल समस्या; 3 महिन्यात तोडगा निघणार

Gokhale Bridge
Gokhale BridgeMumbai

मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पुलाच्या जोडीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबत आयआयटी मुंबईकडून अहवाल मागवण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआयने नुकतीच गोखले पुलाची पाहणी केली. लवकरच आयआयटी, व्हीजेटीआय व मुंबई महापालिकेची बैठक होणार असून पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

Gokhale Bridge
Thane : तासाचा प्रवास पाच मिनिटात; 'त्या' 4.47 किमी खाडीपुलासाठी MMRDAचे टेंडर

धोकादायक झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबर २०२३ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर पुलाचे काम सुरू असून गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण २६ फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे महापालिकेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या समस्येवर उपाय सूचवण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता. त्यानुसार व्हीजेटीआयने आपला अहवाल महापालिकेला सादर केला आहे.

Gokhale Bridge
Mumbai News : मुंबईच्या खड्डेमुक्तीसाठी काय आहे बीएमसीचा मास्टर प्लॅन?

व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे. तरीही आयआयटी मुंबईकडून याबाबत अहवाल मागवला असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com