Mumbai News : मुंबईच्या खड्डेमुक्तीसाठी काय आहे बीएमसीचा मास्टर प्लॅन?

Tender
Tendertendernama

मुंबई (Mumbai) : पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आल्यामुळे महापालिका (BMC) कामाला लागली असून पावसाळ्याआधी मुंबई खड्डेमुक्त (Potholes Free Mumbai) करण्यासाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व रस्त्यांची तपासणी करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. (Good News For Mumbaikars)

Tender
Konkan Expressway : मुंबई-गोवा हायवे आता विसरा; MSRDC देणार सुसाट प्रवासाचे 2 नवे पर्याय

खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टीक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती सुद्धा केली जाणार आहे. शिवाय नालेसफाई करताना पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष काम करून पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका (BMC) प्रशासनाकडून देण्यात आली.

Tender
Ambulance Scam : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वाजणार 10 हजार कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा 'सायरन'

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

यामध्ये सुमारे 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी महापालिकेकडून कार्यवाहीदेखील सुरू आहे. मात्र शहरातील रस्त्यांसाठी 1400 कोटींचे टेंडर काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर दोन्ही उपनगरांतील 910 कामांपैकी 787 कामे अजून सुरू झालेली नाहीत.

Tender
Nashik ZP : बांधकाम विभागांच्या निष्क्रियतेमुळे वाढणार 56 कोटींचे दायीत्व

यातच पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे खड्ड्यांचा मनस्ताप रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत खास पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या ज्या ठिकाणी खड्डे असतील ते पावसाळ्याआधी बुजवण्यात येतील, असेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Tender
Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेचा अखर्चित 163 कोटींचा निधी परत जाणार; कारण...

मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. यात मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत फक्त 123 कामे सुरू झाली असून उर्वरित 787 कामांना सुरुवातही झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतीपथावर आहेत.

Tender
Nashik : नाशकातील 26 ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतरचा नवा मुहूर्त

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टीक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मास्टीक डांबरीकणात 180 ते 200 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टीक अस्फाल्टचा वापर करण्यात येत आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com