Shrivardhan Tourism: श्रीवर्धनचा कायापालट; कणघर येथे 20 एकरांवर उभारणार भव्य बायोडायव्हर्सिटी झोन

पर्यटनातून स्थानिक रोजगाराला गती देण्यासाठी म्हसळा-श्रीवर्धनमध्ये विविध प्रकल्पांचे नियोजन; दिवेआगार किनाऱ्यावर मरीन थीमवर सौंदर्यीकरण व वॉटर स्पोर्ट्स सुरू होणार
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
aditi tatkareTendernama
Published on

मुंबई: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी म्हसळा तालुक्यातील कणघर येथे तब्बल २० एकर जागेवर भव्य 'बायोडायव्हर्सिटी झोन' (जैवविविधता क्षेत्र) विकसित केला जाणार आहे. यासाठी तातडीने २० एकर जागा निश्चित करून पक्षी निरीक्षण केंद्र, वॉक-वे आणि पाथ-वे उभारण्याचा प्राथमिक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
Navi Mumbai Medicity: क्लीव्हलँड क्लिनिक आणि ब्रुकफिल्डची महाराष्ट्रात एन्ट्री; 10 हजार नोकऱ्यांसह नवी मुंबईत साकारणार जागतिक आरोग्य केंद्र

कोकणातील निसर्गसंपन्न रायगड जिल्ह्यातील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमधील पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी मंत्रालयात एका विशेष उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्रीवर्धन मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि नवीन पर्यटन प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), महाडचे कार्यकारी अभियंता कांबळे, जिल्हा वनसंरक्षक जाधव, उपअभियंता सोनिया महिल, रोहा विभागाचे वन अधिकारी स्वप्नील चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) संतोष रोकडे व संतोष जाधव यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे (MMB) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
Dharavi Transport Hub: देशातील पहिले 'मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब' धारावीत साकारणार

कणघरमध्ये दुर्मीळ पक्ष्यांचे संवर्धन आणि पक्षी निरीक्षण केंद्र
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, श्रीवर्धन परिसरात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता असून पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी या वनसंपदेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. म्हसळा तालुक्यातील कणघर परिसरात निलगिरी वूड पिजन (Nilgiri wood pigeon), मलबार पॅराकीट (Malabar parakeet), मलबार ग्रे हॉर्नबिल (Malabar grey hornbill), व्हाईट-चीक्ड बार्बेट (White-cheeked barbet) आणि पर्पल-रम्प्ड सनबर्ड (Purple-rumped sunbird) यांसारख्या अत्यंत दुर्मीळ आणि देखण्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.

या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासोबतच पर्यटक आणि पक्षीप्रेमींना आकर्षित करण्यासाठी येथे एक अत्याधुनिक पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यात यावे. तसेच, संपूर्ण २० एकर परिसरात पर्यटकांना फिरण्यासाठी निसर्गाला पूरक असे वॉक-वे आणि पाथ-वे विकसित करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी वन विभागाला दिल्या आहेत.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
Mumbai-Pune Bullet Train: बुलेट ट्रेनमुळे मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटांत; CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

दिवेआगार समुद्रकिनाऱ्याचे मरीन थीमवर सौंदर्यीकरण
या बैठकीत दिवेआगार येथील प्रस्तावित भव्य ॲक्वारियम (मत्स्यालय) आणि समुद्रकिनारा सौंदर्यीकरणाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. दिवेआगार किनाऱ्याचा विकास करताना तिथे 'मरीन थीम'चा वापर करून सौंदर्यीकरण करावे. संपूर्ण प्रकल्पात पर्यावरणपूरक आणि सौरऊर्जेवर आधारित अद्ययावत सुविधांचा वापर करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. यासोबतच दिवेआगार येथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी तातडीने वॉटर स्पोर्ट्स (पाण्याचे खेळ) सुरू करण्याच्या दृष्टीने मेरीटाईम बोर्डाने आवश्यक ती तांत्रिक व प्रशासकीय कारवाई पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
Virar Alibaug Multimodal Corridor: 66 हजार कोटींच्या विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी लवकरच टेंडर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाचे काम वेगाने पूर्ण करणार
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेल्या हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या कामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. या मार्गाचे काम अत्यंत दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, जेणेकरून पर्यटकांना आणि भाविकांना सुरक्षित व विलोभनीय प्रदक्षिणेचा अनुभव घेता येईल, अशा स्पष्ट सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यास कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईनला मंजुरी; तब्बल पावणेदोन तासांची बचत होणार

Key Points Summary

  • म्हसळा तालुक्यातील कणघर येथे २० एकर जागेवर भव्य बायोडायव्हर्सिटी झोन उभारणार.

  • परिसरातील निलगिरी वूड पिजन, मलबार हॉर्नबिल सारख्या दुर्मीळ पक्ष्यांसाठी अद्ययावत पक्षी निरीक्षण केंद्र साकारणार.

  • पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी बायोडायव्हर्सिटी झोनमध्ये वॉक-वे आणि पाथ-वे उभारणार.

  • दिवेआगार समुद्रकिनाऱ्याचे 'मरीन थीम'वर सौंदर्यीकरण करणार आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करणार.

  • दिवेआगार प्रकल्पांमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित सुविधांचा वापर करण्याच्या सूचना.

  • प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या कामाला अधिक गती देण्याचे प्रशासनाला निर्देश.

Tendernama
www.tendernama.com