अबब! मुंबईत कोणी खरेदी केला तब्बल 98 कोटींचा फ्लॅट? जाणून घ्या...

N Chandrasekaran
N ChandrasekaranTendernama

मुंबई (Mumbai) : कोरोना महामारीतून बांधकाम क्षेत्र सावरल्यानंतर आता मुंबईत आलिशान घरांच्या खरेदीचे मोठे सौदे पार पडत असल्याचे दिसते. टाटा समूहाचे (Tata Group) अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) आणि कुटुंबियांनी मुंबईतील पेडर रोड येथील एका आलिशान टॉवरमध्ये घर खरेदी केले आहे. या ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी चंद्रशेखरन यांनी थोडी थोडकी नव्हे तर 98 कोटी रुपये एवढी किंमत मोजली आहे. हा सौदा मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील काही महागड्या सौद्यांपैकी एक ठरला आहे.

N Chandrasekaran
बुलेट ट्रेनचे मोठे टेंडर बांधकाम क्षेत्रातल्या 'या' बलाढ्य कंपनीला

पेडर रोडवरील '33 साऊथ' या 28 मजली इमारतीत 11व्या आणि 12व्या मजल्यावर त्यांनी हा ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. या घराचे एकूण क्षेत्रफळ 6,000 चौरस फूट एवढे आहे. याच फ्लॅटमध्ये चंद्रशेखरन कुटुंबिय गेली 5 वर्षे भाड्याने राहत होते. या फ्लॅटचे महिन्याचे भाडे देखील 20 लाख इतके होते.

N Chandrasekaran
५ हजार कोटींचे 'ते' टेंडर टाटा मोटर्सकडे; २५ हजार रोजगाराच्या संधी

21 फेब्रुवारी 2017 रोजी चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते या फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. यानंतर आता त्यांनी 3 दिवसांपूर्वी हे घर खरेदी केले. 1 लाख 63 हजार प्रति चौरस फूट या दराने हे घर खरेदी करण्यात आले.

N Chandrasekaran
गुंठेवारीबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय; तुकडेबंदी उठली?

पेडर रोड, मलबार हिल हे मुंबईतील सर्वात महागडे परिसर ओळखले जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये येथे घरखरेदीचे अनेक मोठे सौदे पार पडले आहेत. घर खरेदी करण्याच्या बाबतीत देशात मुंबई हे सर्वांत महागडे शहर म्हणून ओळखले जाते. वन बीएचके घर देखील मुंबईत कोट्यवधी रुपयांना विकले जाते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com