बुलेट ट्रेनचे मोठे टेंडर बांधकाम क्षेत्रातल्या 'या' बलाढ्य कंपनीला

Bullet Train
Bullet TrainTendernama

मुंबई (Mumbai) : बांधकाम क्षेत्रातील बलाढ्य लार्सन अँड टुर्बो कन्स्ट्रक्शन कंपनीने मुंबई आणि अहमदाबाद या भारतातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मोठे टेंडर पटकावण्यात यश मिळवले आहे. हे टेंडर सुमारे २५०० ते ५००० कोटींदरम्यान आहे.

Bullet Train
हिंद महामिनरल कोल वॉशरीतून एक लाख २० हजार टन कोळसा गेला कुठे?

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पातील 116 किलोमीटर मार्गाच्या हाय-स्पीड बॅलेस्टलेस ट्रॅकच्या कामासाठी एल अँड टी कन्स्ट्रक्शनने नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत करार केला आहे. या स्लॅब ट्रॅक सिस्टममुळे बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावू शकणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ही देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी कंपनी आहे.

Bullet Train
मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन; तब्बल 21 किमीच्या बोगद्यासाठी...

बॅलास्टलेस ट्रॅक किंवा स्लॅब ट्रॅक हा एक विशिष्ट प्रकारचा रेल्वे ट्रॅक आहे. टेंडरमध्ये गुजरातमधील वडोदरा आणि साबरमती टप्प्यातील बुलेट ट्रेनची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पात जपानी शिंकनसेन ट्रॅक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या, एल अँड टी कन्स्ट्रक्शन देशात आणि विदेशातील अनेक मेट्रो प्रकल्पांमध्ये विविध बॅलेस्टलेस ट्रॅक प्रकल्प राबवत आहे.

Bullet Train
'टेंडरनामा' IMPACT : सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला निर्देश

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि शिवसेनेतील राजकीय भांडणामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची महाराष्ट्रातील अंमलबजावणी रखडलेली आहे. बुलेट ट्रेनचा राज्याला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही, त्यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडण्याची गरज नाही, अशी राज्य सरकारमधील बहुतांश नेत्यांची भावना आहे. तरी सुद्धा गुजरात राज्यात प्रकल्पाचे बांधकाम आणि ट्रॅकच्या कामांची बहुतांश टेंडर वितरीत झाली आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या मते, गुजरातमधील विविध जिल्ह्यांमधील नर्मदा, साबरमती, माही, तापी इत्यादी नद्यांवर फाउंडेशन आणि पिलर वर्क तसेच इतर पायाभूत कामे यांसारखी विविध बांधकामे सध्या प्रगतीपथावर आहेत. भरुचमध्ये नर्मदा नदीवरील 1.2 किमी लांबीच्या पूलाचे काम गतीने सुरु आहे. 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवरील हा सर्वात लांब पूल आहे. या हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत, गुजरातमधील विविध नद्यांवर तब्बल 20 पूल बांधले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com