Thane : रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; 'मल्टीमॉडेल ट्रांझिट हब' म्हणून...

Thane Railway Station
Thane Railway StationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. पुनर्विकासात येथे ११ मजल्यांचा भव्य टॉवर उभारण्यात येणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (RLDA) या प्रकल्पाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिका या स्थानकाचा 'मल्टीमॉडेल ट्रांझिट हब' म्हणून विकास करत आहे.

Thane Railway Station
Mumbai : NHAI बांधणार पागोटे ते चौक नवा महामार्ग; 2900 कोटींचे बजेट

याअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ९००० चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या १० (अ ) प्लॅटफॉर्मजवळील जागेचा विकास केला जात आहे. या जागेवर ११ मजली टॉवर – १ उभारला जाणार आहे. यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हिसची सुविधा असणार आहे. तळमजला आणि पोट मजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉनकोर्स फ्लोअर प्रवासी बसेससाठी असणार आहे. तसेच आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.

Thane Railway Station
Mumbai : अकराशे कोटीत साकारतंय बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक; कधी होणार पूर्ण?

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) आठ मजल्यातील २४,२८० चौरस मीटर बिल्टअप जागा ६० वर्षांच्या भाडे करारावर देणार आहे. भाडेतत्त्वावरील क्षेत्र बेअर-शेल संरचना म्हणून दिले जाणार आहे. कॉमन एरिया आणि युटिलिटीजचे बांधकाम रेल्वे प्राधिकरण करणार आहे. हा ११ मजली टॉवर-१ इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा ३० जून २०२६ पर्यंत भाडेतत्त्वावर हस्तांतरित केली जाणार आहे. सॅटीस अंतर्गत चांगल्या कनेक्टीव्हिटीसाठी २.२४ किलोमीटरचा वर्तुळाकार एलिव्हेटेड रोड लिंक स्पॅनिंग ठाणे महापालिका उभारणार आहे. हा मार्ग पूर्वद्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वेस्थानक पूर्व असा असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० येथील एलिवेटेड डेकला हा मार्ग जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांना कॉनकोर्सला पोहोचता येणार आहेच शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. येथे मल्टी मॉडेल ट्रांझिट हब अंतर्गत बस, रेल्वे आणि मेट्रो जोडली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com