Mumbai : अकराशे कोटीत साकारतंय बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक; कधी होणार पूर्ण?

Indu Mill
Indu MillTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : दादरच्या इंदू मिलमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम 52 टक्के पूर्ण झाले असून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे 230 फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. येत्या वर्षभरात स्मारकाचे पूर्णत्वास जाईल असा अंदाज आहे. या स्मारकावर सुमारे १ हजार ८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Indu Mill
Aditya Thackeray : बीएमसी लुटणाऱ्यांवर कारवाई कधी? रस्ते, स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याला कुणाचे अभय!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारने शापूरजी पालनजी या कंत्राटदाराची स्मारकाच्या उभारणीसाठी नियुक्ती केली. प्रकल्पाचे सल्लागार मे. शशी प्रभू अँड असोसिएट्स आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एकूण उंची 350 फूट असून त्याखालील पादपीठाची उंची 100 फूट आहे. सध्या पुतळ्याचे काम 230 फुटांपर्यंत पूर्ण झाले आहे. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार हे दिल्ली येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम करीत आहेत. इमारत प्रवेशद्वाराचे 88 टक्के, व्याख्यान वर्ग 77 टक्के, ग्रंथालय 80 टक्के, प्रेक्षागृह 63 टक्के, बेसमेंट वाहनतळ 95 टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1 हजार 89 कोटी 95 लाख असून आतापर्यंत प्रकल्पावर 37 टक्के खर्च झाला आहे. हे स्मारक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने दिली आहे.

Indu Mill
राज्यात जुन्या धोरणाप्रमाणेच वाळू ठेक्यांचे होणार लिलाव; वर्षात 1 हजार कोटींचा बुडाला महसूल

स्मारक संकुलाची संकल्पना बौद्ध वास्तूरचना शैलीवर आहे. इमारतीच्या पादपीठामध्ये शैलीदार घुमट, संग्रहालय, प्रदर्शन भरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मारकात 68 टक्के खुली हरित जागा ठेवली जाणार आहे. संशोधन केंद्रामधील ग्रंथालयात त्यांच्याबद्दलची पुस्तके, लेख, जीवनचरित्र, माहितीपट आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय योगदानावर संशोधन करण्याची व्यवस्था असेल. 100 लोकांची आसन क्षमता असलेले 4 व्याख्यान वर्ग तसेच हजार लोकांची क्षमता असलेले प्रेक्षागृह, ध्यानधारणा केंद्र, चवदार तळ्याची प्रतिकृती इत्यादी गोष्टी स्मारकाला खुलवणार आहेत.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com