Mumbai : NHAI बांधणार पागोटे ते चौक नवा महामार्ग; 2900 कोटींचे बजेट

NHAI
NHAITendernama
Published on

मुंबई (Mumbai) : उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरावर (जेएनपीए) येणार्‍या कंटेनरची बेलापूर, खारघर, पनवेल भागातील वर्दळ कमी करण्यासाठी जेएनपीए ते जुना पुणे महामार्ग असा नवा २९ किलोमीटरचा विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी सुमारे २,९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अडीच वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. तसेच या मार्गासाठी १७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. या महामार्गामुळे चिरनेर गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

NHAI
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी; यापुढे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विलंबास...

जेएनपीएवर दररोज पाच हजारहून अधिक कंटेनर व ट्रक पुणे दिशेने येतात. तितकेच ट्रक उत्तरेकडून ठाणे दिशेने येतात. या दोन्ही बाजूंनी ट्रक ठाणे-बेलापूर रस्ता किंवा पुणे द्रुतगती मार्गावरुन पनवेल किंवा बेलापूर, खारघर या भागातील रस्त्यांचा उपयोग करतात. त्यातून कोंडी होते व स्थानिकांनाही त्याचा त्रास होतो. नव्या महामार्गामुळे यापासून सुटका होणार आहे. याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, 'एनएचएआय'ने केले आहे. जेएनपीएजवळील पागोटे ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चौकदरम्यान नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. ही जागा बेलापूरहून 'जेएनपीए'कडे येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथून चौकपर्यंत २९.२१९ किमी लांबीचा हा नवा महामार्ग असेल. हा महामार्ग बहुतांश उन्नत, जमिनीवरील रस्ता व दोन बोगद्यांचा असेल. ६० मीटर रुंदी व सहा पदरी असा हा महामार्ग असेल.

NHAI
Mumbai : अकराशे कोटीत साकारतंय बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक; कधी होणार पूर्ण?

यामुळे दक्षिणेकडून (पुणे दिशेने येणार्‍या) वाहनांना पनवेल किंवा बेलापूरपर्यंत येण्याची गरज नसेल. थेट 'जेएनपीए' गाठू शकतील. त्याचप्रमाणे उत्तर दिशेने येणार्‍या वाहनांनाही ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्त होऊन जुन्या पुणे महामार्गाने चौकपर्यंत येऊन दहा मिनिटांत 'जेएनपीए' गाठणे शक्य होणार आहे. या महामार्गावर चिरनेर, गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, असे तीन आंतरबदल असतील. त्याखेरीज 'अटल सेतू'ने येणारी वाहनेही चिरनेर जवळून हा महामार्ग धरु शकतील. हा पूर्णपणे नवा महामार्ग असल्याने तो 'एनएचएआय'च्या 'अ' वर्ग श्रेणीत ठेवण्यात आला आहे. या महामार्गामुळे चिरनेर गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरु झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com