Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा तिप्पट दराचे टेंडर; कोणी केला आरोप?

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी यंदा तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. दरवर्षी ४० कोटी रूपयांत खड्डे भरले जात असताना मग यंदा १२५ कोटी रुपये कशासाठी ? असा सवाल काँग्रेसने केला आहे. कंत्राटदारांचे भले करण्यासाठी ही फिक्सिंग करून लूट सुरू असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला आहे.

BMC
टेंडरमध्ये कार्टेल करणाऱ्या 'त्या' 11 ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा

पश्चिम उपनगर ८४ कोटी रुपये, पूर्व उपनगर २८ कोटी रुपये आणि शहर विभागासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटद्वारे खड्डे भरण्यासाठी ८० कोटी रुपयांची आणि अस्फाल्टद्वारे खड्डे भरण्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आता मुंबई म्युन्सिपल करप्शन झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला.

BMC
BMC: टेंडर हाताळणारी 'सॅप' कॅगच्या रडारवर; विनाटेंडर 159 कोटींचे..

मुंबईत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर खड्डे बुजवण्यासाठी काढले जातात. यंदा या खड्डेमुक्तीसाठी तिप्पट रुपयांचे कंत्राट काढण्यात आले. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. कंत्राटदाराचे आणि सरकारचे पोट भरण्यासाठीचा हा उपक्रम आहे. या कामाला स्थगिती द्या, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

BMC
Mumbai-Pune द्रुतगती मार्गावरील अपघातांची संख्या खरच कमी झालीय का?

बृहन्मुंबई महापालिकेने टेंडर काढले आहे. सिमेंटच्या प्रणालीसाठी ८ कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ४ कोटी ९२ लाख एक गोलचासाठी वापरण्यात येणार आहे. १४ कोटी रुपये यासाठी वापरण्यात येणार आहेत. खड्डे कुठे पडणार हे तुम्हाला माहीत आहे का असा सवाल करुन ही फक्त बृहन्मुंबई महापालिकेची पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com