Navi Mumbai Metro: नवी मुंबई विमानतळाला मेट्रो कनेक्टिव्हिटी; 17 किमीच्या दोन मार्गिका

बेलापूर-सागर संगम आणि पेंधर-विमानतळ मार्गिकांची एकूण लांबी १७.०९ किमी; अंमलबजावणीची जबाबदारी एमएमआरसीएलकडे
Metro
MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नवी मुंबईतील मेट्रो जाळ्याचा विस्तार करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी देणाऱ्या मेट्रो मार्गिका १अ आणि मार्गिका २ च्या अंमलबजावणीला वेग आला आहे. एकूण १७.०९ किलोमीटर लांबीच्या या दोन उन्नत मार्गिकांसाठी सुमारे ५ हजार ५७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला जात असून, तो महिनाभरात केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.

Metro
Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रोचा मार्ग बदलणार? काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

सिडकोने उभारलेली सीबीडी बेलापूर-पेंधर ही ११.१ किलोमीटर लांबीची नवी मुंबई मेट्रो मार्गिका सध्या प्रवासी सेवेत आहे. या मार्गिकेचा दोन्ही बाजूंनी विस्तार करण्यासाठी बेलापूर-सागर संगम मेट्रो मार्गिका १अ आणि पेंधर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका २ अशा दोन मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.

या दोन्ही मार्गिकांची एकत्रित लांबी १७.०९ किलोमीटर असून, त्यावर एकूण १२ उन्नत स्थानकांचे नियोजन आहे. राज्य सरकारने २२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलकडे सोपवण्यात आली आहे.

Metro
Maharashtra Metro: पुढील 5 वर्षांत नव्या 300 किमी मार्गवरून धावणार मेट्रो

सिडकोऐवजी एमएमआरसीएलकडे अंमलबजावणी

नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोने तयार केला आहे. या प्रकल्पाची उभारणी सिडकोकडून केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे मार्गिका १अ आणि मार्गिका २ च्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी एमएमआरसीएलकडे सोपवली आहे.

एमएमआरसीएलने मुंबईतील आरे-कफ परेड मेट्रो मार्गिका ३ चे बांधकाम केले असून, या मार्गिकेचे संचालन आणि व्यवस्थापनही कंपनीकडून केले जात आहे. आणिक आगार-गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ च्या अंमलबजावणीची जबाबदारीही एमएमआरसीएलकडे आहे. आता नवी मुंबई मेट्रोच्या विस्तार प्रकल्पाची जबाबदारीदेखील या कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

Metro
Mumbai Bandra Connector: मुंबईत वांद्रे सागरी सेतू ते वांद्रे किल्ला कनेक्टर; 45 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांवर येणार

प्रकल्पासाठी ५,५७५ कोटींचा खर्च

नवी मुंबई मेट्रो मार्गिका १अ आणि मार्गिका २ च्या कामासाठी एकूण ५ हजार ५७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी केंद्र सरकारकडून अंदाजे ७१३ कोटी रुपये समभाग निधीच्या स्वरूपात मिळणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक असल्याने एमएमआरसीएलकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रस्ताव महिनाभरात केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीएलमधील सूत्रांनी दिली.

Metro
Nashik Metro: नाशिककरांचे मेट्रोचे स्वप्न साकार होणार? 31 किमीचे 2 भव्य कॉरिडोर आणि 30 स्थानकांचे होणार सर्वेक्षण

बेलापूर-सागर संगम मार्गिका ३.०२ किमी

मेट्रो मार्गिका १अ सीबीडी बेलापूर ते सागर संगमदरम्यान उभारण्यात येणार आहे. ही मार्गिका ३.०२ किलोमीटर लांबीची असेल आणि त्यामध्ये एका उन्नत स्थानकाचा समावेश असेल.

ही मार्गिका सध्या कार्यरत असलेल्या सीबीडी बेलापूर-पेंधर मेट्रो मार्गिका १ शी जोडली जाईल. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकालाही विस्तारित मेट्रो जाळ्याशी जोडण्यात येणार असल्याने उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोदरम्यान प्रवाशांना वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे.

सागर संगम परिसरात या मार्गिकेची प्रस्तावित मुंबई-नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिका ८ शी जोडणी होणार आहे. मेट्रो मार्गिका ८ ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारी प्रस्तावित सुमारे ३५ किलोमीटरची विमानतळ मेट्रो मार्गिका आहे.

Metro
Navi Mumbai Metro च्या 5,575 कोटींच्या 2 नव्या मार्गांना मंजुरी; तळोजा, कळंबोली, खांदेश्वरला मिळणार थेट T4 कनेक्टिव्हिटी

पेंधरपासून विमानतळापर्यंत ११ स्थानके

मेट्रो मार्गिका २ पेंधरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उभारली जाणार आहे. या मार्गिकेची लांबी १४.०७ किलोमीटर असून, त्यावर ११ उन्नत स्थानकांचा समावेश आहे.

मार्गिका २ मुळे पेंधर आणि परिसरातील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-४ पर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मेट्रो मार्गिका १अ आणि मार्गिका २ या दोन्ही मार्गिका विद्यमान बेलापूर-पेंधर मार्गिकेशी एकात्मिक केल्यानंतर सागर संगमपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सलग मेट्रो जाळे निर्माण होणार आहे.

Metro
Pune Metro Line 3: आयटी हबची कोंडी फुटणार! 'या' दिवसापासून हिंजवडी ते बालेवाडी प्रवास होणार सुखाचा

Key Points

  • नवी मुंबई मेट्रो मार्गिका १अ आणि २ चा प्रस्ताव महिनाभरात केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार.

  • दोन्ही मार्गिकांची एकत्रित लांबी १७.०९ किलोमीटर आहे.

  • प्रकल्पासाठी अंदाजे ५,५७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

  • केंद्र सरकारकडून अंदाजे ७१३ कोटी रुपयांचा समभाग निधी अपेक्षित.

  • अंमलबजावणीची जबाबदारी सिडकोऐवजी एमएमआरसीएलकडे सोपवण्यात आली.

  • मेट्रो मार्गिका १अ ही सीबीडी बेलापूर-सागर संगम अशी ३.०२ किलोमीटरची असेल.

  • मार्गिका १अ वर एका उन्नत स्थानकाचा समावेश.

  • मेट्रो मार्गिका २ ही पेंधर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी १४.०७ किलोमीटरची असेल.

  • मार्गिका २ वर ११ उन्नत स्थानकांचा समावेश.

  • सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक विस्तारित मेट्रो जाळ्याशी जोडले जाणार.

  • मार्गिका १अ ची प्रस्तावित मेट्रो मार्गिका ८ शी जोडणी होणार.

  • विद्यमान बेलापूर-पेंधर मार्गिकेशी या दोन्ही मार्गिकांचे एकात्मीकरण केले जाणार.

Tendernama
www.tendernama.com