मुंबईतील रस्त्यांच्या कॉंंक्रिटीकरणासाठी तब्बल सहा हजार कोटींची टेंडर

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांच्या कॉंंक्रिटीकरणासाठी मुंबई महापालिकेने नव्याने सहा हजार कोटींची टेंडर प्रसिद्ध केली आहेत. यात मुंबई शहर-एक, मुंबई पूर्व उपनगर-एक व मुंबई पश्चिम उपनगरसाठी तीन टेंडरचा समावेश आहे.

BMC
Thane : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयडीसीचा पुढाकार; बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे महापालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जात आहेत. मुंबई एकूण सुमारे २०५० किमीचे रस्ते असून त्यापैकी १२२४ किमी रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात महापालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली होती. महापालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली. ती कामे अद्यापही सुरू आहेत.

BMC
Mumbai : 'त्या' 31 मंड्यांचा होणार कायापालट; बीएमसीचे 105 कोटींचे बजेट

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींची टेंडर मागवण्यात आली होती. दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी २०२३ महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ९१० पैकी केवळ ११ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर नुकतेच शहर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी १३६२ कोटींचे नव्याने टेंडर मागवण्यात आले आहे. ही टेंडर प्रक्रिया सुरू असताना आता पुन्हा एकदा संपूर्ण मुंबईतील ४०० किमी रस्त्यांच्या कामांसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

विभागनिहाय टेंडर -
शहर ….११४२ कोटी
पूर्व उपनगर …..१२९७ कोटी
पश्चिम उपनगर …..८६४ कोटी
पश्चिम उपनगर………१४०० कोटी
पश्चिम उपनगर……..१५६६ कोटी 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com