BMC
BMCTendernama

Mumbai : 'त्या' 31 मंड्यांचा होणार कायापालट; बीएमसीचे 105 कोटींचे बजेट

मुंबई (Mumbai) : मुंबईतील जुन्या झालेल्या ३१ मंड्याचा पुनर्विकास केला जात आहे. मुंबई महापालिका यासाठी १०५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

BMC
'त्या' प्रकल्पांचा पर्यटन डीपीआर तातडीने सादर करा; अजित पवारांचे आदेश

मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारित ९२ किरकोळ मंड्या तर समायोजन आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या १०८ मंड्या आहेत. तसेच १६ खासगी मंड्या असून या सर्व मंड्यांमध्ये एकूण १८,७६० परवानाधारक आहेत. जुन्या व धोकादायक झालेल्या ११ मंड्यांच्या पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. यात चार मंड्यांचे काम सुरु असून माझगाव परिसरातील बाबू गेणू मंडईचे काम प्रगतीपथावर असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर परळच्या शिरोडकर मंडईचे काम २० टक्के काम पूर्ण झाले आहे. महात्मा ज्योतिबा फुले मंडईचे ३५ टक्के काम व टोपीवाला मंडईचे ५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर सात मंड्यांचे आराखडे मंजुरीच्या प्रक्रियेत असून मंजुरी मिळाल्यानंतर या मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कुलाबा मंडई, परळगाव मंडई, हेमंत मांजरेकर मंडई, मुलुंड पूर्व मंडई यांच्या व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.

BMC
Mumbai : बीएमसीचा 'येथे' 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प; 200 कोटींचे टेंडर

२० मंड्यांचा पुनर्विकास मंडई असोसिएशनने नेमलेल्या खासगी विकासामार्फत विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली २०३४ मधील विनियम ३३(२१) (सी) अन्वये केला जात असून ८ मंड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर दोन मंड्यांचे बांधकाम प्रगती पथावर आहे. मंड्याचा पुनर्विकास करताना मुंबई महापालिका मंड्यातील कचरा ऐरोली जकात नाक्याच्या अंशतः भूभागावर सेंद्रीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात विल्हेवाट लावली जात असल्याचे सांगण्यात आले.

Tendernama
www.tendernama.com