Thane : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयडीसीचा पुढाकार; बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वागळे इस्टेट भागातील नेहरूनगरमधील भूखंडावर ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याचे भूमीपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्याने वाहनतळ इमारत उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Eknath Shinde
'त्या' प्रकल्पांचा पर्यटन डीपीआर तातडीने सादर करा; अजित पवारांचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून रस्ते रुंदीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असले तरी शहरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने स्थानक परिसर तसेच शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ उभारणीची कामे हाती घेतली असून त्यापैकी काही वाहनतळांची कामे पूर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली झाली आहेत. त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील भूखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde
Mumbai : 'त्या' 31 मंड्यांचा होणार कायापालट; बीएमसीचे 105 कोटींचे बजेट

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगर येथे हा भूखंड आहे. याठिकाणी ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून यासंंबंधीच्या प्रस्तावास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २२ ऑगस्ट २०२३ च्या बैठकीत मान्यता दिली. यानंतर महामंडळाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बहुमजली वाहनतळ इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुमजली वाहनतळ इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. तळ अधिक पाच मजली इमारत बांधण्यात येणार असून त्याच्या गच्चीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जाणार आहे. या कामासाठी ३१ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. ५८९ क्षमतेचे हे वाहनतळ असणार आहे. यामध्ये १४६ दुचाकी, १५० तीनचाकी, २५० चारचाकी आणि ४३ सायकल उभे करणे शक्य होणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com