ST Bus, MSRTC
ST Bus, MSRTCTendernama

MSRTC : Good News! 'लालपरी'ला येणार अच्छे दिन! खटारा गाड्यांबाबत काय घेतला निर्णय?

Pratap Sarnaik, Ajit Pawar : 5 वर्षांत 25 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदी करणार
Published on

मुंबई (Mumbai) : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला (MSRTC) लवकरच अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत. परिवहन मंत्र्यांनी केलेल्या धडाकेबाज घोषणेमुळे लवकरच एसटी महामंडळातील खटारा गाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

परिवहन मंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केलीय, सरकारने कुठला निर्णय घेतलाय, त्याचा परिवहन महामंडळ आणि लालपरीतून प्रवास करणाऱ्या राज्यभरातील प्रवाशांवर काय परिणाम होणार आहे हे समजून घेण्यासाठी ही बातमी वाचाच!

ST Bus, MSRTC
Mumbai : 'केईएम' रुग्णालयात उभी राहतेय 21 मजली इमारत; 100 कोटींचे टेंडर 'त्या' कंपनीच्या खिशात

एसटी महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

ST Bus, MSRTC
Mumbai : 'त्या' 14 हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे वेळेची 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत

त्यानंतर सरनाईक म्हणाले, सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्षे पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षांत प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःच्या बसेस घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली. त्याबद्दल परिवहन मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ST Bus, MSRTC
Mumbai : 'त्या' 14 हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे वेळेची 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत

परिवहन मंत्री म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे २०२९ मध्ये या २५  हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल, गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी आपण देऊ शकणार आहोत.

आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटीवर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे.

ST Bus, MSRTC
Pune : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर आता तीन स्थानकांऐवजी...

या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com