MHADA : म्हाडाच्या 'त्या' 17 भूखंडांचा लिलाव का लांबला? टेंडरलाही मुदतवाढ

Mhada
MhadaTendernama

मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या मुंबई मंडळाने (MHADA Mumbai Board) मुंबईतील विविध वापरासाठीच्या १७ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. या ई-लिलावासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे.

टेंडर सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या भूखंडांसाठी टेंडर सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबई मंडळाला या भूखंडांच्या विक्रीतून सुमारे १२५ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

Mhada
Nashik : स्वखर्चाने गाळ खोदून वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा नवा निर्णय

मुंबई मंडळाने मुंबईतील १७ भूखंड मार्चमध्ये विक्रीसाठी काढले आहेत. मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा त्यात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाचे हे भूखंड असून या भूखंडासाठी मुंबई मंडळाने बोली निश्चित केली आहे.

या भूखंडांसाठी प्रति चौरस मीटर ४५ हजार ३०० रुपयांपासून १ लाख ६ हजार १७० रुपयांपर्यंत दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीहून अधिक बोली लावणाऱ्या संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई – लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Mhada
Pune : धक्कादायक, पुण्यात दररोज तब्बल 900 वाहनांची पडते भर

मुंबई मंडळाला या भूखंडांच्या विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई – लिलावासाठी १३ मार्च रोजी टटेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. असे असताना टेंडर दाखल करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ई – लिलावास प्रतिसाद वाढावा यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. पण त्याचवेळी आचारसंहिता काळात ई – लिलावाची प्रक्रिया पार पाडणे शक्य नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा विचार आहे. याला मुख्य अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला जाईल. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये भूखंडांचा ई – लिलाव होण्याची शक्यता आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com